मुंबई – वरळीतील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जुहू येथील ग्लोबल तापस बारमधील अनधिकृत बांधकाम पाडले !
मुंबई – जुहू येथील हॉटेल किंग इंटरनॅशनल लगतच्या ग्लोबल तापस बारमधील अनधिकृत बांधकाम मुंबई महानगरपालिका प्रशासनाने १० जुलै या दिवशी पाडले. याच बारमध्ये वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याने अपघातापूर्वी मित्रांसमवेत मद्यप्राशन केले होते. येथे तरुणांना बेकायदेशीररित्या मद्य दिल्याप्रकरणी बारवर कारवाई करण्यात येत आहे.
राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी !
मुंबई – वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याचे वडील राजेश शहा यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मिहीर शहा याने भरधाव गाडीने वरळीत एका महिलेला चिरडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मृत महिलेच्या कुटुंबासाठी मुख्यमंत्र्यांची अर्थसाहाय्याची घोषणा !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी प्रकरणातील पीडित नाखवा कुटंबाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून १० लाख रुपये देण्याचे घोषित केले आहे.