शिक्षा पूर्ण झाल्यावर बांगलादेशात पाठवले जाणार !
सूरत (गुजरात) – येथे बनावट आधारकार्ड बनवून भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करणार्या मल्लिका साकीन सरदार (वय ६३ वर्षे) या बांगलादेशी महिलेला दोषी ठरवण्यात आले असून तिला १४ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षा पूर्ण झाल्यावर तिला बांगलादेशला पाठवले जाणार आहे. शिक्षेचा कालावधी वाढवण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सरकारी अधिवक्त्यांनी सांगितले आहे.
A Bangladeshi woman has been sentenced to 14 months in prison on charges of making duplicate Aadhaar card in Surat.
She will be sent back to #Bangladesh after completing her sentence!
There are more than 5 crore Bangladeshi illegal immigrants living in the country, and their… pic.twitter.com/YXMGmPP0VQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 10, 2024
मल्लिका मूळची बांगलादेशातील गोपालगंज जिल्ह्यातील सलाबतपूर भागातील मंदारवाजा टेनेमेंटची रहिवासी आहे. तिच्याकडून बांगलादेशी पारपत्र, भारतीय आधारकार्ड, कोरोना लसीकरण प्रमाणपत्रही सापडले आहे. ती वर्ष २०२० पासून सूरतमध्ये रहात होती.
संपादकीय भूमिकादेशात ५ कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोर रहातात आणि त्यात प्रतिदिन वाढ होत असतांना एखाद्या महिलेला पकडून तिला शिक्षा केल्याने विशेष काही परिणाम होणार आहे, असे नाही ! बांगलादेशींना बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या स्तरावर जोरकसपणे प्रयत्न होतांना दिसत नाहीत, हे लज्जास्पद आहे ! |