छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ रस्ता बंद आंदोलन !

कोल्हापूर येथे रस्ता बंद आंदोलन करणारे हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – पुणे शहरात हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर जिहादी मानसिकतेच्या पठाण याने दगडफेक केली. याच्या निषेधार्थ कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर-सांगली रस्त्यावर ‘तावडे हॉटेल’ येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी अशा प्रकारची विटंबना करणार्‍यांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करावा, अशी मागणी करण्यात आली. याच मागणीसाठी सांगली येथील अंकल चौक येथही सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनाच्या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक देसाई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  श्री. उदय भोसले, हिंदु एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाप्रमुख श्री. कुंदन पाटील, बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी, सर्वश्री अर्जुन आंबी, अभिजित पाटील, निरंजन शिंदे, नीलेश शिंदे, विशाल खोचीकर यांसह अन्य उपस्थित होते.