तेलंगाणामध्ये हिंदुद्रोही सरकारची दबावनीती आणि हिंदु राष्ट्राचा संघर्ष !

‘तेलंगाणा राष्ट्र समिती’चे के. चंद्रशेखर राव यांचे सरकार – केवळ मुसलमानांचे लांगूलचालन !

१. तेलंगाणा स्वतंत्र राज्य झाल्यापासून हिंदूंवरील अत्याचारांमध्ये वाढ

‘संयुक्त आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस्. राजशेखर रेड्डी होते, तेव्हा त्यांनी हिंदूंचे धर्मांतर करण्यावर अधिक भर दिला. त्यांच्या पश्चात किरण कुमार रेड्डी मुख्यमंत्री बनले. त्यानंतर वर्ष २०१४ मध्ये तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश ही वेगळी राज्ये झाली अन्  तेलंगाणामध्ये ‘तेलंगाणा राष्ट्र समिती’चे के. चंद्रशेखर राव यांचे सरकार सत्तेवर आले. वर्ष २०१४ पासून सत्ता संपेपर्यंत त्यांनी केवळ मुसलमानांचे लांगूलचालन करणे, मशिदी उभारणे, जुन्या मशिदींना निधी देणे, मौलवींना प्रतिमास वेतन देणे, मौलवींच्या अनुयायांना आर्थिक साहाय्य देणे, हेच काम केले. हा सर्व पैसा हिंदूंकडून घेतल्या जाणार्‍या करातून देण्यात आला. तेव्हापासून तेथे आजपर्यंत हिंदूंवर केवळ आणि केवळ अत्याचारच होत आहेत.

२. सहस्रो पोलिसांच्या गराड्यात मुनव्वर फारुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुनव्वर फारुकी

तेलंगाणामध्ये हिंदु देवतांवर अश्लील शब्दांत विडंबन करणार्‍या मुनव्वर फारुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचे आयोजक तेलंगाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा मुलगा होता. त्या कार्यक्रमाला संपूर्ण तेलंगाणा राज्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कडाडून विरोध केला. हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या मुलासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. तो म्हणाला, ‘‘मी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि तो कुणीही थांबवू शकत नाही.’’ त्यांच्या हातात सत्ता होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्नांची शर्थ केली. या कार्यक्रमाला प्रसारमाध्यमे, दूरचित्रवाहिन्या, वर्तमानपत्रे, भित्तीपत्रके यांच्या माध्यमातून तीव्र विरोध झाला. एवढे होऊनही दुर्दैवाने हिंदुद्रोही फारुकीचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमासाठी २-३ सहस्र लोक आले होते; पण ते सर्वच्या सर्व धर्मांध मुसलमान होते. त्यांच्या संरक्षणासाठी ६-७ सहस्र पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रत्येक मार्गावर आणि प्रत्येक चौकात सर्वत्र पोलीस तैनात करण्यात आले होते. एका हिंदुद्वेष्ट्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उभे होते.

३. मुनव्वर फारुकीच्या कार्यक्रमाच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कार्यक्रमामुळे टी. राजा सिंह यांना अटक !

कार्यक्रम होण्यापूर्वी आम्हीही त्यांना एक चेतावणी दिली होती, ‘‘तुम्ही हिंदु देवतांविषयी एक शब्द जरी चुकीचा बोलला, तर आम्हीही त्याचे खंडण करण्यासाठी १-२ शब्द नक्कीच बोलणार. त्यामुळे तुम्ही बोलतांनाच विचार करून बोलावे.’’ संपूर्ण कार्यक्रमात हिंदु देवतांविषयी तो काहीच बोलला नाही; परंतु जाता जाता तो २-४ शब्द बोललाच ! त्यानंतर आम्हीही एक विनोदी कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमानंतर धर्मांध अतिशय आक्रमक झाले आणि रस्त्यावर उतरले. ते म्हणाले की, ‘आता राजा सिंह यांचे डोके धडावेगळे करणारच (सर तन से जुदा करेंगे).’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘माझी काही बकरीची मान नाही, जो कुणीही येऊन कापून घेऊन जाईल.’’ धर्मांध मुसलमानांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या. त्यामुळे तेथे दंगलीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी मला अटक करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी मला त्वरित अटक केली.

४. चेतावणी देऊन टी. राजा सिंह यांची सुटका !

अटकेनंतर पोलीस मला न्यायालयात घेऊन गेले. तेथेही मला अत्यंत चांगले दृश्य पहायला मिळाले. माझ्या समर्थनासाठी झाडून सर्व हिंदु अधिवक्ता न्यायालयात उभे राहिले आणि दुसर्‍या बाजूला धर्मांध मुसलमानांचे सर्व अधिवक्ता उभे होते. मला कारागृहात पाठवले जाणार होते. त्यामुळे न्यायालयाच्या आजूबाजूचे वातावरण अत्यंत तणावग्रस्त बनले होते. तेथेही कलम १४४ लागू करण्यात आले होते. ज्या मार्गाने मला कारागृहात घेऊन जाणार होते, त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीसदल तैनात होते. आमचे अधिवक्ता म्हणाले, ‘‘पूर्वसूचना (नोटीस) न देता कोणत्याही आमदाराला अटक करता येत नाही. पूर्वसूचना न देता आमदाराला अटक करण्यापूर्वी तुम्ही लेखी सूचना द्या की, ‘या आमदाराने काय विधान केले आहे ? आमदाराने बोलतांना कुणाचेही नाव घेतलेले नाही. सर्वाेच्च न्यायालयाचा एक कायदा आहे. त्यानुसार पूर्वसूचना न देता आमदाराला कारागृहात पाठवता येत नाही.’’ तेथे १०० मुसलमान अधिवक्ते होते. त्यांना वाटत होते की, आज त्यांच्या युक्तीवादामुळे आमदार राजा सिंह कारागृहात जाणार अाहेत. त्यांच्यापेक्षा आमचे अधिवक्ते हुशार निघाले. त्यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा संदर्भ देऊन सांगितले, ‘‘आपण या आमदाराला कारागृहात पाठवले, तर आपल्यावरही (न्यायदंडाधिकार्‍यांवरही) कारवाई होऊ शकते.’’ त्यानंतर न्यायदंडाधिकारी धर्मसंकटात पडले. त्यामुळे कार्यालयाची वेळ संपल्यावरही ते रात्री ८ वाजेपर्यंत जागेवरच बसून होते. त्यानंतर त्यांनी ठरवले की, राजा सिंह यांना चेतावणी देऊन सोडून देऊया. त्यानुसार त्यांनी माझ्याकडून एका लहानशा कागदावर लिहून घेतले, ‘पुढील वेळी मी अशा प्रकारचे प्रक्षोभक भाषण किंवा अशा प्रकारची ध्वनीचित्रफीत बनवणार नाही.’ त्या दिवशी मला अटक न करता घरी सोडण्यात आले.

५. धर्मांध मुसलमानांच्या प्रचंड दबावामुळे परत अटक होऊन ७७ दिवसांनी सुटका !

त्या दिवशी मला न्यायालयापासून माझ्या घरापर्यंत पोचवण्यासाठी माझ्या समवेत २०० ते ३०० पोलीस होते; कारण न्यायालयापासून घरापर्यंतचा भाग संपूर्ण मुसलमानबहुल होता. त्या दिवशी माझ्यावर आक्रमण करण्याचे धर्मांध मुसलमानांचे नियोजन होते. मी घरी पोचत नाही, तोच ‘राजा सिंहला अटक न करता घरी सोडून दिले’, अशी वार्ता सर्वत्र पसरली. ‘पोलिसांमुळेच राजा सिंहला अटक न करता सोडण्यात आले. त्यांनी त्याच्याविरुद्ध महत्त्वपूर्ण कलमे लावली नाहीत’, अशी ओरड धर्मांध मुसलमानांनी चालू केली. भाग्यनगरमधील वातावरण पुन्हा तणावग्रस्त बनले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महमूद अली खान यांनी बैठक घेतली. ‘राजा सिंह याला दुसर्‍या दिवशी कारागृहात पाठवले नाही, तर संपूर्ण शहर आगीत भस्मसात् होईल’, अशी त्यांना भीती वाटू लागली. त्यांनी माझ्यावर ‘पीडी ॲक्ट’ (प्रिव्हेंटिव्ह डिटेंशन ॲक्ट – प्रतिबंधात्मक अटक करण्यासाठीचा कायदा) लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते (२२.८.२०२२ या दिवशी) मला परत अटक करण्यासाठी आले. या कायद्यांतर्गत अटक झाल्यास मला किमान १२ मास जामीन मिळणार नाही, असे पोलिसाने सांगितले. मी त्याला सांगितले, ‘‘केवळ १२ मास ? वर्ष २००४ मध्ये मी ३ मास कारागृहात गेलो. त्यानंतर वर्ष २००५ मध्ये ६ मासांसाठी पुन्हा कारागृहात गेलो. त्यानंतर कधी ४५ दिवस, कधी ४० दिवस कारावास भोगला. संयुक्त आंध्रप्रदेश सरकारच्या काळात धर्मांतर आणि गोहत्या यांच्या विरोधात लढतांना आमचे अनेकदा कारागृहात येणे-जाणे चालू होते.’’ या वेळी आमदार झाल्यानंतर प्रथमच मी अधिक काळ म्हणजे तब्बल ७७ दिवस कारागृहात विश्रांती घेतली.

६. कारागृहातून सुटल्यानंतर धर्मकार्याला जोमाने प्रारंभ !

सरकारला वाटले की, मी कारागृहात गेलो, तर घाबरून जाईन; परंतु मला कारागृहात पुष्कळ विश्रांती करण्याची संधी मिळाली. कारागृह माझ्यासाठी ‘फार्म हाऊस’च होते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुष्कळ चांगले वातावरण निर्माण झाले. लोकांना वाटले की, मला भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे हा तडजोड करील, घाबरून जाईल आणि कोणताही कार्यक्रम करणार नाही. ‘कारागृहातून बाहेर आल्यानंतर कोणतीही सभा आणि पत्रकार परिषद घ्यायची नाही, तसेच परत कोणतेही वादग्रस्त विधान करायचे नाही’, असे मला न्यायदंडाधिकार्‍यांनी स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशानंतर मी १५ दिवस गप्प बसलो. त्यानंतर मी परत नेहमीचे कार्य चालू केले. महाराष्ट्रात ९ सभा घेतल्या. माझ्यावर ९ गुन्हे नोंदवण्यात आले. छत्तीसगड, राजस्थान, कोटा अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम चालूच आहेत. माझ्यावरील आधीच्या खटल्यांमध्ये आणखी ४५ खटल्यांची भर पडली.

७. पोलिसांच्या निर्बंधांमुळे धर्मकार्याच्या अडचणीत वाढ !

कारागृहातून बाहेर पडल्यानंतर हिंदुत्वाचे कार्य करण्यात थोडी अडचण आली. कोणताही कार्यक्रम असला, तरी पोलीस कार्यक्रमाच्या आयोजकांना आणि कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या प्रतिष्ठित व्यक्तींना नोटिसा देऊ लागले. मी त्यांचे ऐकले नाही, तर गुन्हा नोंदवू लागले. उदाहरणार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल’विषयीच्या तेलुगु भाषेतील ग्रंथाचा प्रकाशन सोहळा होता. या कार्यक्रमाला वरिष्ठ सनदी अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी येणार होते. समितीच्या पदाधिकार्‍यांनी मला आधीच आग्रहाचे निमंत्रण दिले होते. मी त्यांना सांगितले, ‘‘मी तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार असेन, तर तुमच्या या कार्यक्रमाला मुळीच अनुमती मिळणार नाही. त्यामुळे तो कार्यक्रम तुम्हीच पार पाडा.’’ तसेच घडले. शेवटच्या क्षणी पोलीस आयुक्तांनी अनुमती रहित केली. त्यामुळे ‘हलाल’विषयीच्या ग्रंथाचे प्रकाशन होऊ शकले नाही.

बकरी ईदच्या पूर्वी तेलंगाणा सरकारने एक बैठक घेतली. त्यात ‘कुणीही गोरक्षक गोतस्करी थांबवण्यासाठी रस्त्यावर आला, तर प्रथम त्यालाच अटक करून कारागृहात टाकले जाईल’, असा निर्णय घेण्यात आला, तसेच गोरक्षण करणार्‍यांच्या धारिका (फाईल) उघडून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्याचे ठरले. त्यात अशी कलमे लावली जातील की, ते किमान ३ मास कारागृहातून बाहेर पडू शकणार नाहीत, असेही ठरले. अशा प्रकारे तेलंगाणात हिंदूंवर एवढे अत्याचार केले जातात की, तेवढे बंगाल आणि केरळ राज्यांमध्यही होत नाहीत.

श्रीरामनवमी शोभायात्रा रहित करण्यासाठी मुलाचे अपहरण करण्याची धमकी !

श्री. टी. राजा सिंह

‘हिंदूंनो, घाबरू नका, जीवनात आज ना उद्या आपल्याला मरायचेच आहे. देश आणि धर्म यांसाठी मरण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत. मला एक मुलगी आणि ३ मुले आहेत. माझा एक मुलगा १७ वर्षांचा आहे. त्याचे अपहरण करण्याची धमकी मला मिळाली होती. मला पुनः पुन्हा दूरभाष येत होता, ‘श्रीरामनवमीपर्यंत तुझ्या मुलाचे अपहरण करण्यात येणार आहे. यावर्षी श्रीरामनवमी शोभायात्रा काढली, तर आम्ही त्याला संपवणार.’ मी लिखित स्वरूपात पोलिसांत तक्रार दिली; पण कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही आणि चौकशीही झाली नाही.

जेथे तेलंगाणातील सर्वांत मोठी मशीद आहे, तेथे नेऊन मी मुलाला म्हटले, ‘‘आपण कोण आहोत, हे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना कळेल. जर गुरु गोविंदसिंह त्यांच्या मुलांचे बलीदान करू शकतात, तर आपण का नाही ?’’ मीही आव्हान दिले, ‘कुणामध्ये धाडस असेल, तर त्याने येथे येऊन मुलाला घेऊन जावे. माझ्यानंतर माझा हा पुत्र हिंदुत्वाचे कार्य करणार आहे. तोही हिंदुत्वाचे कार्य करत मृत्यू पावला, तर मला आणखी २ मुले आहेत. याच्यानंतर ते हिंदुत्वाचे कार्य करतील.’ हिंदूंना जागृत करायचे असेल, तर आपल्याला रस्त्यावर उतरावेच लागेल. आपण रस्त्यावर उतरलो, तरच हिंदू जागृत होतील, अन्यथा वर्ष २०२४ नंतरचा काळ अत्यंत भयावह आहे. त्या काळाला थोपवण्यासाठी आपण काय करू शकतो, या विषयावर सर्वांनी आताच गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.’

– श्री. टी. राजा सिंह, आमदार, भाजप, गोशामहल, भाग्यनगर.

८. हिंदुत्वाला सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपचे योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रेरणा घेणे आवश्यक !

राजस्थानमध्ये केवळ प्रसारमाध्यमातून नुपूर शर्मा हिला पाठिंबा दिला; म्हणून हिंदु शिंप्याची मान कापण्यात आली. अशाच प्रकारे विविध राज्यांमध्ये हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. हिंदू केवळ मरण्यासाठीच जन्माला आले आहेत का ? भारतातील १०० कोटी हिंदूंपैकी १ कोटी हिंदूंनाही आपण जागृत करू शकत नाही का ? आणि अन्य ९९ कोटी हिंदू केवळ नपुंसक आहेत का ? आपण १०० कोटी हिंदूंपैकी १ कोटी हिंदूंना जरी एकत्र करण्यात यशस्वी झालो, तर हिंदूंच्या विविध मागण्या मान्य होतील. भारतात हिंदुत्वाला सुरक्षित ठेवायचे असेल, तर भाजप नेते आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हिंदू असेच कीड्यामुंग्यांसारखे मारले जातील, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मारले जातील किंवा त्यांना कारागृहात डांबले जाईल. त्यामुळे धर्मकार्य करण्यास हिंदु तरुण मागे हटतील.

९. आतंकवाद्यांचा ठार मारण्याचा कट अयशस्वी !

मी कारागृहातून बाहेर पडण्याची ३ आतंकवादी प्रतीक्षा करत होते. त्यांच्यातील एक आतंकवादी बाँबस्फोट केल्याप्रकरणी १७ वर्षे कारागृहात राहून आला होता. त्याने वाहतूक पोलिसांवर बाँब फेकला होता. त्यात ३ पोलीस ठार झाले होते आणि १ आतंकवादी मारला गेला होता. १७ वर्षांनी कारागृहातून बाहेर आल्यावरही तो परत बाँबस्फोट करण्याचाच कट रचत असतो. तो आतंकवादी पाकिस्तानमधून हातबाँब आणतो, तसेच ‘आर्डीएक्स’चा बंदोबस्त करतो. एका हिंदु उत्सवाच्या वेळी माझ्यावर बाँब फेकण्याचे त्याचे नियोजन होते. त्या लोकांना अटक करण्यात आली. याविषयी तेलंगाणा सरकारच्या गुप्तचर विभागाला माहिती मिळाली होती; पण त्याविषयी त्यांनी मला सावधगिरीच्या सूचना दिल्या नाहीत.

१०. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठांनी साधना करण्याविना पर्याय नाही !

संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्र आणायचे असेल, तर आपल्याला साधना करावी लागेल आणि ईश्वरचरणी लीन व्हावे लागेल. आपण जेवढी अधिक साधना करू आणि ईश्वराच्या चरणांचे ध्यान करू, तेवढी आपल्याला अधिक शक्ती मिळेल. आपल्यावर कुणी आक्रमण केल्यास आपण किमान स्वत:चे रक्षण करून १० जणांना मारू शकलो पाहिजे. आपल्या गल्लीला वाचवू शकलो पाहिजे. अशा प्रकारचे स्वसंरक्षण प्रशिक्षण आतापासून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र येणारच आहे आणि त्याला कुणीही थांबवू शकत नाही.

११. निद्रिस्त हिंदूंना जागृत करण्याची आवश्यकता !

वर्ष २०२४ नंतर भारतातील प्रत्येक हिंदु उभा राहून हिंदु राष्ट्रासाठी घोषणा देईल. हिंदु राष्ट्राची घोषणा होईल, तेव्हा धर्मांध शांत बसून रहातील, असा विचार कुणीही करू नये. हिंदु राष्ट्राच्या दिशेने देश वाटचाल करू लागेल, तेव्हा तेही त्यांची आगाऊ योजना बनवून ठेवतील. बंगालमध्ये एकेकाळी दंगली झाल्या होत्या. तेव्हा हिंदूंना लक्ष्य करून ठार मारण्यात आले होते. त्याच प्रकारे त्यांनी आताही नियोजन करून ठेवले आहे. हिंदूंची अल्प संख्या असलेले भाग आणि मवाळ हिंदू असलेले भाग त्यांनी हेरून ठेवले आहेत. ज्या दिवशी ते सूड घेण्यास प्रारंभ करतील, तेव्हा मवाळ हिंदू नाहक मारले जातील. तेव्हा आपण काहीच करू शकणार नाही. आपला हिंदु समाज निद्रिस्त आहे. त्याला आजच जागृत करण्याची आवश्यकता आहे.

१२. हिंदूंनो, स्वसंरक्षण शिकून एवढे कराच !

प्रत्येक गल्लीत १ सहस्र हिंदू रहात असतील, तर किमान १०० जणांना तरी स्वसंरक्षणाचेप्रशिक्षण दिले पाहिजे. लाठी, कराटे आदीक आपण त्यांना शिकवू शकलो, तर ते ९०० जणांचे तरी रक्षण करू शकतील. आपले कुटुंब, गल्ली आणि वस्ती यांना वाचवा,  आतंकवादी येऊन क्षणात सर्वनाश करतील. ‘आपण राहू किंवा न राहू; पण आज आपण हिंदु राष्ट्रासाठी लढत आहोत, उद्या आपली मुले हिंदु राष्ट्रासाठी लढली पाहिजेत’, असा संकल्प हवा. हिंदुत्वनिष्ठांनी अहंकार बाजूला ठेवणे आवश्यक आहे. कुणी हिंदुत्वाची गोष्ट बोलत असेल, तर त्यांनाही जवळ करा. त्यांना आपल्यापासून लांब जाऊ देऊ नका.

– श्री. टी. राजा सिंह, आमदार, गोशामहल, भाग्यनगर.