मंदिर हे धार्मिक स्थळ आहे; हिंदु बांधवांचे ऊर्जास्थान आहे. मंदिर संस्कृती ही व्यापक असून ती जगात आदर्श निर्माण करणारी आहे. मंदिरांचे कार्य समाजामध्ये जागृती करणे आहे. पूर्वीच्या काळात इंग्रज आणि मोगल आक्रमक यांनी मंदिर संस्कृती नष्ट करण्याचा अन् हिंदूंच्या धर्मश्रद्धा संपवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मंदिरांचा विध्वंस केला, मंदिरांमध्ये गोमांस टाकले, मंदिरातील मूर्तींचे भंजन केले. आपल्याला असे वाटते की, केवळ त्याच काळात असे होत होते. सध्या असे घडत आहे का ?, तर होय ! सध्याच्या काळातही मंदिर, मंदिर संस्कृती, हिंदूंच्या श्रद्धा यांवर आघात होत आहेत.
काळ पालटला असला, स्वतंत्र भारतात कायदे लागू झाले असले, तरी मंदिर संस्कृतीवरील आघात थांबतांना दिसत नाहीत. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक अशा अनेक राज्यांत प्रवास करतांना मंदिरांच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात आल्या. मंदिराचा परिसर, यात्रा, उत्सव आणि अन्य ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने अन् वस्तू विक्रीच्या निमित्ताने अहिंदूंच्या माध्यमातून कशा प्रकारे नवे आक्रमण चालू झाले आहे, हे लक्षात आले. मंदिरांशी संबंधित सेवा आणि व्यवहार यांमध्ये धर्मांधांचा वाढता शिरकाव, उद्दामपणा अन् सहभाग या गोष्टी चिंतनीय आहेत. याविषयी येणार्या वर्षभरामध्ये आपल्याला मंदिरांविषयी काही योजना आखाव्या लागतील !
१. धर्मांधांचा विविध पद्धतीने मंदिरांमध्ये होणारा शिरकाव !
जागरूकतेच्या अभावामुळे ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी, तसेच सर्वधर्मसमभावाचा विचार असणारे विश्वस्त असणार्या बर्याच मंदिरांत यात्रेच्या वेळी अहिंदूंना दुकाने लावण्यासाठी अनुमती दिली जाते. उदा. पुणे येथील मोरया गोसावी मंदिर परिसरात प्रत्येक चतुर्थीला धर्मांधांचे स्टॉल लागतात, शक्तीपिठांपैकी एक असलेल्या माहूर (जिल्हा यवतमाळ) येथील प्रसिद्ध श्री रेणुकामातेच्या मंदिरामध्ये कुंकू किंवा पूजासाहित्य विक्री हे अहिंदु लोक करत आहेत. जे मूर्तीपूजा मानत नाहीत, जे आपल्या देवतांना मानत नाहीत, जे गोमांस खातात, असे लोक त्या ठिकाणी व्यवसाय करतात ! जर त्यांना एकदा हिंदु मंदिराच्या आवारात फळे, फुले, खेळणी आदींची दुकाने थाटायला किंवा व्यवसाय करायला संधी दिली, तर भविष्यात त्यांचा उद्दामपणा वाढेल. एकीकडे हिंदूंना संधी न मिळाल्याने ते बेरोजगार रहातात, तर दुसरीकडे मूर्तीपूजेवर विश्वास नसणारे अहिंदु मंदिर परिसरात दुकाने लावतात. महत्त्वाचे म्हणजे आपला पैसा धर्मविरोधी लोकांना का द्यायचा ? याचाही हिंदूंना विचार करावा लागणार आहे. याखेरीज अहिंदूंनी शिरकाव केल्याने निर्माण होणारा मंदिर सुरक्षेचा प्रश्नही आपण लक्षात घेतला पाहिजे. मंदिर परिसरात व्यवसाय करण्याची संधी केवळ श्रद्धाळू आणि देवाला मानणार्यांना दिली पाहिजे. विचार करा, एखाद्या मशिदीच्या परिसरात ते अन्य धर्मियांना व्यवसाय करू देतात का ? आपला व्यवसाय हा ‘H to H’ म्हणून हिंदूंपासून हिंदूंपर्यंत असायला हवा.
अनेक राज्यांत असे अनुभवायला आले आहे की, बर्याच मंदिर परिसरांत फुलवाले मुसलमान असतात. आपण सामाजिक माध्यमांमधून अनेक व्हिडिओ पाहिले असतील की, ज्यामध्ये थूंक जिहाद करून अर्थात् फुले-फळे यांना थुंकी लावून त्याची भक्तांना विक्री केली जाते. धर्मांधांची थुंकी लागलेली फळे-फुले देवतांना वाहिली जातात, तसेच काही वेळा त्याच फुलांचा हार देवतेच्या गळ्यात घातला जातो. धर्मांध हे एक नियोजित षड्यंत्र रचून कार्य करत आहेत. त्याचेच उदाहरण ‘थूंक जिहाद’ आहे. या संदर्भात कर्नाटकात चालवलेल्या एका अभियानामुळे दक्षिण कर्नाटकमध्ये पुष्कळ जागरूकता निर्माण झाली.
मंदिर सुरक्षेच्या अंतर्गत आगामी उपक्रम
१. मंदिरांमध्ये आणि उत्सव काळातील समित्यांमध्ये अहिंदूंना प्रवेश करता येणार नाही, याविषयी जागरूकता निर्माण करणे
२. याविषयी मंदिर विश्वस्तांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना निवेदन देणे
३. याविषयी गावपातळीवर ठराव संमत करणे
४. ‘हिंदू ते हिंदू’ अशी व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे
५. मंदिर परिसरात व्यवसाय आणि दुकाने यांसाठी हिंदूंनाच स्थान मिळेल, अशी व्यवस्था करणे
६. जर अहिंदूंना मंदिर परिसरात व्यवसाय करायचाच असेल, तर त्यांना प्रतिज्ञापत्रावर ‘त्या देवतेविषयी त्यांची श्रद्धा आहे’, असे प्रकट करावे लागेल, तसेच ‘देवतेची उपासना आणि हिंदुत्वाविषयी अभिमानाची भावना प्रकट करावी लागेल’, अशी मागणी हिंदूंनी करायला हवी.
– श्री. सुनील घनवट
२. अहिंदूंनी हॉटेल्स आणि उपाहारगृहे मोठ्या प्रमाणावर चालू करणे, हे मंदिर सुरक्षेसाठी धोकादायक !
मंदिरांच्या जागेवर किंवा परिसरात उत्सव काळात किंवा कायमस्वरूपी धर्मांधांना हॉटेल किंवा उपाहारगृह यांसाठी भाडेतत्त्वावर जागा दिल्या जातात. उदाहरणार्थ उज्जैनला महाकालेश्वर मंदिर परिसरातील अनेक हॉटेल्स अहिंदु चालवतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी आदी सण-उत्सवांच्या वेळी, तसेच यात्रांच्या वेळी लाखो हिंदू देवाच्या दर्शनाला येतात; मात्र अहिंदूंकडून सर्व वस्तू, पूजासाहित्य, फळे, फुले घेतात. यातून धर्मांधांचा लाखोंचा व्यवसाय होतो. तोच पैसा पुढे हिंदूंच्याच विरोधात वापरला जाणार नाही, याची शाश्वती कोण देणार ? तसेच अनेक धर्मांध हलाल खाद्यपदार्थांची विक्री करतात. धर्मांध आम्हाला हलाल पदार्थ देऊन आमचा धर्म भ्रष्ट करतात. रामनवमी, नवरात्र अशा उत्सवांना ते विरोध करत दंगलीही घडवून आणतात. त्यामुळे मंदिर सुरक्षेविषयीसुद्धा मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी गावपातळीवर काही ठराव करून हे थांबवायला हवे.
३. मंदिर परिसरात नोकरी किंवा व्यवसाय करणारे; पण स्वतःच्या धर्माविषयी कट्टर असणारे अहिंदू !
बर्याचदा मंदिरातील बांधकाम, जीर्णोद्धार किंवा डागडुजी करणे यांसाठी अहिंदू कामगारांना नेमले जाते. धर्मांधांकडून जर आपण मंदिरांचे काम करून घेतले, तर मंदिराचे पावित्र्य जपले जाईल का ?
हिंदूंच्या तीर्थस्थळी बर्याच ठिकाणी अहिंदू ‘गाईड’ (म्हणजे मार्गदर्शन करणारी अधिकृत व्यक्ती) असतात, तेसुद्धा त्या ठिकाणी दिशाभूल करत असतात. उदा. महाबळेश्वर किंवा हिंदूंची प्रसिद्ध तीर्थस्थळे या ठिकाणी जे गाईड्स आहेत, ते खरी माहिती देत नाहीत. ते फसवणूक करतात. ते त्या स्थळाचा सत्य इतिहास न सांगता त्यांना हवे त्या पद्धतीने माहिती सांगतात. उदाहरणार्थ विशाळगडावर हिंदु देवतांच्या मंदिरांचा इतिहास न सांगता रेहानबाबाचा उदो उदो केला जात आहे. तुलनात्मक विचार केला, तर अन्य धर्मियांच्या किती प्रार्थनास्थळांमध्ये हिंदूंना काम दिले जाते ?
४. देवतांचा प्रसाद आपण ‘हलाल’चा (इस्लामनुसार वैध) तर देत नाही ना ?
‘हलाल’ उत्पादनांचा विषय आपण सर्वांना माहिती आहे; परंतु देवतेला आपण हलाल उत्पादनापासून बनवलेला प्रसाद तर देत नाही ना ? हे पाहिले पाहिजे. देवाचा प्रसाद हा भक्तीभावाने आणि सोवळ्यात बनवला जातो; परंतु देवाच्या प्रसादासाठी वापरण्यात येणार्या वस्तू, उदा. तेल, तूप, रवा या सगळ्या गोष्टी ‘हलाल प्रमाणित’ होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आपल्या मंदिरांमध्ये शुद्ध साहित्याचा प्रसाद दिला जातो कि धर्मांधांनी बनवलेल्या हलाल उत्पादनापासून बनवलेला प्रसाद दिला जातो ? हे पहायला पाहिजे. उदाहरणार्थ शबरीमला देवस्थानात ‘हलाल प्रसाद’ भक्तांना दिला जात होता. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी याविषयी केरळ उच्च न्यायालयात याचिका केल्यानंतर हा प्रकार बंद झाला. आपल्यालाही असे कुठे आढळून आले, तर आपण त्याचा सनदशीर मार्गाने विरोध करायला हवा. महाराष्ट्रात डोंबिवली येथे मंदिर परिसरात हलाल उत्पादनांचा स्टॉल लावण्यात येत होता. हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर तो बंद करावा लागला.
कर्नाटक राज्यात युगादीच्या दुसर्या दिवशी मांसाहारी भोजन करण्याची पद्धत आहे. ९५ टक्के लोक हलाल मांस खायचे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने जागृती केल्यावर ८५ टक्क्यांहून अधिक लोक हलाल मांस सोडून झटका मांस खायला लागले.
५. चुकीच्या प्रथा-परंपरा यांच्या माध्यमातून अहिंदूंना मंदिरात प्रवेश !
महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये देवीला पशूबळी देण्याची पद्धत आहे. तेथेही अहिंदूंना बोलावून पशूबळी दिला जातो. अहिंदूंना बोलावण्याची ही चुकीची पद्धत बंद केली पाहिजे. असे कोणत्या मंदिरात होत असेल, तर त्याला मंदिरात प्रतिबंध केला पाहिजे.
६. सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये निधर्मीपणाच्या नावाखाली काही मंदिरात मुसलमानांना नोकरी दिली जाणे
महाराष्ट्रातील सरकारीकरण झालेल्या प्रसिद्ध शनिशिंगणापूर मंदिरात (जिल्हा अहिल्यानगर) सध्या काही कर्मचारी हे मुसलमान आहेत. ते कर्मचारी मंदिरात चौथर्यावर जाऊन सेवा करतात; परंतु त्या ठिकाणी ते काय खाऊन येतात? मटण-मांस खातात, गोमांस खातात. मंदिरात अशा प्रकारचे कर्मचारी ठेवून आपण काय साध्य करतो ? याचाही विचार करणे आवश्यक आहे. सर्वधर्मसमभाव, उदारमतवादी धोरण आदी थांबवले पाहिजे. खासगी आणि सार्वजनिक मंदिरांत तर हे बंदच व्हायला हवे अन् सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्येही याला विरोध करायला पाहिजे. भविष्यात मंदिरांची सुरक्षा यामुळे अडचणीत येऊ शकते, याचा विचार करणे अपेक्षित आहे.
सरकारीकरण झालेल्या मंदिरांसमवेतच काही खासगी किंवा सार्वजनिक मंदिरांतही बर्याचदा धर्म आणि परंपरा विरोधी कार्यक्रम, व्याख्याने, कीर्तने इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिर परिसरात असे धर्महानी करणारे कार्यक्रम होणे अपेक्षित नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.
७. नास्तिकतावादी किंवा न्यायव्यवस्थेच्या अयोग्य निर्णयाला विरोध करण्यासाठी दबावगट सिद्ध करा !
यापूर्वी श्रीशैलम् मंदिराच्या परिसरामध्ये धर्मांधांचे जे स्टॉल लागत होते, त्याला मंदिर विश्वस्तांनी विरोध केला. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने मंदिराच्या बाजूने निर्णय दिला; परंतु सर्वोच्च न्यायालयाने व्यवसाय कुठेही करू शकतो, अशा प्रकारचा निर्णय दिला. विरोध व्यवसाय कुठेही करण्यासाठी नाही, तर तो हिंदूंचे धार्मिक स्थळ असणार्या मंदिरांच्या परिसरात होऊ नये, यासाठी आहे. एकत्रित शक्ती किंवा दबावगट नसल्यामुळे हा हिंदुविरोधी निर्णय झाला.
८. अहिंदूंचे मंदिरावरील आक्रमण यासाठी कारणीभूत हिंदूंची मानसिकता
अ. हिंदूंची असावधानता, आ. भावनिकता, इ. सर्वधर्मसमभावी वृत्ती, ई. केवळ आर्थिक लाभाचा विचार, उ. संघर्ष करण्याच्या सिद्धतेचा अभाव
९. दबावगट सिद्ध करणे
आपण ‘मंदिररक्षण हेच धर्मरक्षण’, असे म्हणत आहोत. मंदिरांचे रक्षण, सुरक्षा यांसाठी, तसेच मंदिरांना भविष्यात अडचण येऊ नये; म्हणून कोणत्याही प्रकारे धर्मांधांचा मंदिरामध्ये प्रवेश होणार नाही, हे पाहिले पाहिजे, मग तो व्यवसाय असेल किंवा अन्य काही ! याविषयी भविष्यकालीन योजना आखून त्यासंदर्भातील नियोजन करावे लागेल. अशा प्रकारचे एक अभियान संपूर्ण भारतभर राबवले जाणार आहे.
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.