Burhanpur Hindu Attacked : कथित धार्मिक भावना दुखावल्यावरून मुसलमानांकडून हिंदु दुकानदाराच्या दुकानाची तोडफोड

हिंदु तरुण घायाळ

हिंदु दुकानदाराच्या दुकानावर आक्रमण

बुर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) – बुर्‍हाणपूर जिल्ह्यात एका तरुणाने इन्स्टाग्रामवर प्रसारित केलेल्या एका पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्यावरून मुसलमानांनी हिंदु दुकानदाराच्या दुकानावर आक्रमण करत तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या प्रकरणी आफताब, रमजान, अरबाज तडवी यांच्यासह काही मुसलमानांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यांतील ८ जणांना अटक करण्यात आली आहे, तर ५ जण पसार आहेत. आक्रमणात घायाळ झालेले सुमित यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.