|
जळगाव, २२ जून (वार्ता.) – गोवंश हत्या आणि अवैध मांस बाळगणार्या ७ धर्मांधांना शहर आणि शनिपेठ पोलिसांनी १८ जून या दिवशी अटक केली होती. त्यांना २१ जून या दिवशी जिल्हा न्यायालयात उपस्थित करत असतांना संशयितांचे वकीलपत्र घेतल्याच्या कारणावरून हिंदु आणि मुसलमान अधिवक्त्यांमध्ये वाद झाला. दुपारी ३ वाजता १ ते दीड सहस्र मुसलमानांचा जमाव न्यायालयाच्या आवारात जमा होऊन तो हिंदु अधिवक्त्यांशी भिडला. समोरासमोर येऊन एकमेकांवर आरडाओरड केल्याने तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. या वेळी गोंधळ आणि वाद घालणार्या धर्मांधांना कह्यात न घेता पोलिसांनी काही हिंदु तरुणांनाच पोलीस ठाण्यात नेले. यामुळे हिंदुत्वनिष्ठ संतप्त झाले आहेत, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता निरंजन चौधरी यांना एका धर्मांधाने धमकी दिली. त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. (खरे तर पोलिसांनी या उद्दाम धर्माधाच्या विरोधात दखलपात्र गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करणे अपेक्षित होते ! – संपादक)
Jalgaon Cow Slaughter Case; Hindu Vidhidnya Parishad advocate Niranjan Chaudhary threatened by fanatics in court premises!
Dispute among advocates over taking up the case of the suspected accused.
Police suppress Hindus instead of booking the fanatics !
Are the police, who… pic.twitter.com/n4lXaWYZzk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 22, 2024
हिंदूंच्या दबावानंतर पोलिसांकडून तक्रार प्रविष्ट, तसेच खोटा आरोप करून धर्मांधाकडून तक्रार प्रविष्ट !
गोवंश हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना न्यायमूर्ती एम्.एम्. बढे यांच्या न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता निरंजन चौधरी संशयित आरोपींचे अधिवक्ता मजहर पठाण यांच्याशी बोलत होते. त्या वेळी धर्मांध नदीम गफ्फार मलिक त्यांच्या मध्येच बोलला. अधिवक्ता चौधरी यांनी त्याला ‘मध्ये बोलू नको’, असे सांगितल्यावर धर्मांध नदीम याने ‘तू बहुत जादा उड रहा है, तुझे देखना पडेगा । वकील आहे ना, तू कोर्ट के बाहर निकल, तुझे देखता हूँ ।’, अशी धमकी दिली.
या प्रकरणी अधिवक्ता निरंजन चौधरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या वेळी पोलीस ठाण्यात हिंदूंचा मोठा जमाव जमला होता. हिंदूंनी पोलिसांवर दबाव टाकल्यानंतर पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घेतली. (एक अधिवक्त्याने तक्रार केल्यानंतर ती प्रविष्ट करून घ्यायलाही जर पोलिसांवर दबावतंत्राचा वापर करावा लागत असेल, तर ते पोलिसांसाठी लज्जास्पद ! – संपादक) दुसरीकडे धर्मांध नदीम मलिक यानेही अधिवक्ता निरंजन चौधरी यांनी त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा कांगावा करून तशी तक्रार केली आहे. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे.
अधिवक्ता केदार भुसारी यांच्या विरोधात मुसलमानांकडून तक्रार प्रविष्ट !
करीम सालार यांच्या नेतृत्वाखाली मुसलमान समाजाच्या शिष्टमंडळाने २१ जून या दिवशी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची भेट घेऊन अधिवक्ता केदार भुसारी यांच्याविरुद्ध चौकशी करण्याविषयी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, अधिवक्ता भुसारी यांनी समविचारी अधिवक्त्यांना समवेत घेऊन ‘गोवंश हत्येच्या गुन्ह्यातील संशयितांचे वकीलपत्र घेऊ नये’, अशी बळजोरी १९ आणि २० जून या दिवशी केली. त्यामुळे शहरातील शांततेला आणि हिंदु-मुसलमान एकतेला तडा जाऊ शकतो. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भुसारी यांनी अधिवक्त्यांच्या गटावर वकीलपत्र न घेण्याविषयी प्रचार केला आहे, असे संशयिताचे अधिवक्ता इमरान शेख यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
६ जणांना न्यायालयीन, तर तिघांना वाढीव कोठडी !
गोवंश हत्या प्रकरणात ६ संशयित आरोपींना न्यायाधीश सोनवणे यांच्या न्यायालयात उपस्थित केले असता त्यांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली, तर न्यायाधीश बढे यांच्या न्यायालयात उपस्थित केलेल्या तिघांना १ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.
न्यायालयाचे कामकाज काही काळ थांबवण्यात आले !
‘न्यायालयाच्या आवारात अनुमाने २० ते २५ मिनिटे जमावाचा गोंधळ चालू होता. परिणामी काहीच ऐकू येत नसल्याने या इमारतीतील न्यायालयांचे कामकाज काही काळ थांबवण्यात आले होते’, असे सरकारी अधिवक्ता सुरेंद्र काबरा यांनी सांगितले. सुरक्षिततेच्या कारणाने २४ जूनपासून न्यायालयाची ४ पैकी २ प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात येणार आहेत.
पळापळ आणि अफवा !
पोलिसांनी लाठीमार चालू करताच जमाव गणेश वसाहत रस्त्यावरील प्रवेशद्वाराने बाहेर पडला. न्यायालयासमोरील आणि गणेश वसाहत येथील दुकाने दंगली होण्याच्या अफवेने १० मिनिटांत बंद झाली. पोलीस उपअधीक्षक गावित यांनी पथकासह न्यायालयात जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
काय आहे प्रकरण ?
१८ जून म्हणजे बकरी ईदच्या दुसर्या दिवशी शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्क भागात शहर पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून धाड घालूनन गोवंशियांची हत्या करणार्या, तसेच अवैध मांसाची वाहतूक करणार्या ६ जणांना, तर शनिपेठ पोलिसांनी ३ जणांना अटक केली होती. यांतील १ संशयित अल्पवयीन आहे. एकूण ९ संशयितांना २० जून या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांना न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर २१ जून या दिवशी पुन्हा न्यायालयात उपस्थित करण्यात येत असतांना वरील प्रकार झाला.
हिंदु आणि मुसलमान या दोन्ही गटांची शेकडो वाहने न्यायालयाच्या परिसरात आली. त्यावरून दोन्ही गटांतील लोक न्यायालयाच्या मध्यवर्ती इमारतीच्या जिन्यावरून जात असतांना समोरासमोर आले. धर्मांधांनी हिंदूंसमवेत शाब्द़िक हुज्जत घातली. यानंतर वाद चालू झाला. पोलीस कर्मचारी आणि घटनेची माहिती मिळाल्यावरून क्यु.आर्.टी. पथक (दंगल नियंत्रक पथक) तातडीने न्यायालयाच्या आवारात आले. त्यानंतरही जमावाकडून वादावादी चालू राहिल्याने पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. पोलिसांनी ३ प्रवेशद्वारे बंद केली. एकाच प्रवेशद्वाराने आत जाण्याचा आणि बाहेर येण्याचा मार्ग चालू होता.
संपादकीय भूमिका
|