१. २२.४.२०२३ या दिवशी आलेल्या अनुभूती
‘२२.४.२०२३ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते.
अ. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) छायाचित्राकडे पाहून माझी कृतज्ञता व्यक्त होत होती.
आ. गुरुदेवांचा चेहरा पिवळसर आणि गुलाबी दिसत होता. ते स्मितहास्य करत होते.
इ. त्यांच्या छायाचित्राकडे पाहून ‘मी प्रत्यक्षात गुरुदेवांच्या चरणांजवळ बसले आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी ‘गुरुदेवांना सूक्ष्मातून बोललेले समजते’, हे मला अनुभवायला आले.
२. ८.५.२०२३ या दिवशी आलेल्या अनुभूती
२ अ. ‘श्रीमन्नारायण स्वरूप गुरुमाऊली श्रीविष्णूच्या रूपात शेषनागावर पहुडली आहे’, असे दिसणे : ८.५.२०२३ या दिवशी मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीमन्नारायण स्वरूप गुरुमाऊली श्रीविष्णूच्या रूपात शेषनागावर पहुडली आहे. शेषनागाच्या डोळ्यांतून केशरी आणि पिवळा या रंगांचा प्रकाश प्रक्षेपित होत आहे. मी गुरुदेवांना पुष्प अर्पण करत आहे. त्या वेळी ते स्मितहास्य करत आहेत.’
त्यांना पाहून माझी भावजागृती झाली. मला ‘या भावस्थितीतच रहावे’, असे वाटत होते.
‘हे गुरुमाऊली, तुमच्याच कृपेने मला या अनुभूती आल्या’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. श्रद्धा नागेंद्र गावडे (वय १७ वर्षे), रामनगर, जिल्हा बेळगाव. (२२.४.२०२३)
|