फोंडा, गोवा येथे झालेल्या एका शिबिराच्या वेळी श्री. अतुल दत्तात्रय वाघ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२४.२.२०२३ ते २६.२.२०२३ या कालावधीत फोंडा, गोवा येथे एक शिबिर झाले. त्या वेळी श्री. अतुल दत्तात्रय वाघ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्री. अतुल दत्तात्रय वाघ

१. हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यावर राष्ट्रासाठी सेवा करण्याची दिशा मिळणे आणि एका संतांना भेटल्यावर ऊर्जा मिळणे

‘मला आधीपासूनच राष्ट्रासाठी काम करण्याची तळमळ होती; पण ‘त्याचा आरंभ कसा करावा आणि काय करावे ?’, हे मला कळत नव्हते. मी मनातच विचार करत बसायचो. जेव्हा माझा हिंदु जनजागृती समितीशी संपर्क आला, तेव्हा मला समजले, ‘हिंदु राष्ट्रासाठी काय सेवा करावी ?’ भगवंतानेच मला आपल्यापर्यंत पोचवले. प.पू. गुरुजींना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) भेटून मला पुष्कळ ऊर्जा मिळाली. ‘ही ऊर्जा न्यून होऊ न देता याच ऊर्जेने धर्मकार्य करत राहू’, असे मी ठरवले.

२. नोकरीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून काम करणे

मी ‘जसलीन इंडो सर्जीकल’ (Jasleen endo-surgical) या आस्थापनामध्ये ‘तांत्रिक’ (Technical) काम बघतो. तेथेही मी भगवंताविषयी श्रद्धा ठेवून काम करतो. त्यामुळे तांत्रिक अडथळे अल्प येतात.

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

३. सनातनचा आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची प्रतिकृती !

२४.२.२०२३ या दिवशी मी ‘रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम’ पाहिला. त्यात असे दिसून आले, ‘हा आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची प्रतिकृती आहे.’ आश्रम पाहिल्यावर ‘रामराज्य कसे असेल ? त्यातील लोक कसे असतील ?’, ते सर्व इथे पहायला मिळाले. आश्रम पहातांना वाटले, ‘आता याचा आरंभ आपल्या घरापासून करावा. आश्रमात सर्वकाही नियोजनबद्ध आणि व्यवस्थित असते. सर्व मांडणी याप्रमाणेच करावी. सर्व जण एकमेकांना साहाय्य करणारे आहेत. असे आपले हिंदु राष्ट्र झाले की, सर्व जनता पुष्कळ आनंदात राहील.’

‘गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपण कायम श्रीकृष्णासारखे मार्गदर्शन करत रहावे. आपली कृपा असावी.’

– श्री. अतुल दत्तात्रय वाघ, जळगाव (२४.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक