Indian  Labourer Dies In Italy : इटलीत काम करणार्‍या भारतियाचा यंत्रामुळे हात कापला गेल्याने मृत्यू

मालकाने उपचारांऐवजी रस्त्याच्या कडेला सोडले !

रोम (इटली) – इटलीमध्ये काम करणार्‍या सतनाम सिंह (वय ३० वर्षे) या भारतीय व्यक्तीचा शेतात काम करतांना यंत्रामुळे हात कापला गेल्याने मृत्यू झाला. हात कापल्यानंतर शेताच्या मालकाने सतनाम सिंह याला घराजवळील रस्त्यावर सोडून दिल्याने त्याला बराच वेळ उपचार मिळाले नाहीत. सतनामची पत्नी आणि मित्र यांनी पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर सतनाम याला विमानातून रोम येथे नेण्यात आले; मात्र रुग्णालयात उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला. भारतीय दूतावासाने सतनामच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचे साहाय्य केले.

दोषींना शिक्षा केली जाईल ! – इटली सरकार

इटलीच्या कामगारमंत्री मरिना काल्डेरोन यांनी या घटनेचा निषेध केला आहे. यासंदर्भात संसदेत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना त्या म्हणाल्या की, ही घटना क्रौर्याचे उदाहरण आहे. अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.