शरिरावर येणारी कंड (खाज) सनातनचा साबण लावल्यावर दूर होणे आणि सनातनची अन्य सात्त्विक उत्पादने वापरल्यावर घरातील वातावरण शांत होणे

सौ. नयना कुळकर्णी

‘मी ४ वर्षांपासून सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात सहभागी होत आहे. आमच्या घरी येणार्‍या गृहकृत्य साहाय्यक (घरकाम करणार्‍या मावशी) सौ. वंदना टोंपे यांची बहीण आणि बहिणीचे यजमान यांना शरिरावर पुष्कळ कंड (खाज) येऊन तिथे काळे डाग पडले होते. नंतर ६ मासांनी त्यांच्या मुलांनाही तसाच त्रास होऊ लागला. त्यांनी १ वर्ष घरगुती उपाय केले. त्यानंतर त्यांनी आधुनिक वैद्यांना दाखवले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी त्यांना रक्ताची तपासणी करायला सांगितली.

याविषयी मला समजल्यावर मी वंदनामावशीला सनातनचा नीम आणि तुळस साबण दाखवला. त्यांनी तो त्यांच्या बहिणीला वापरायला दिला. मावशींच्या बहिणीनेही विश्वास ठेवून सनातनचा साबण वापरायला आरंभ केला. त्यानंतर एका मासात त्यांना शरिरावर कंड येण्याचे प्रमाण उणावले. त्यांच्या शरिरावर पडलेले काळे डाग अनुमाने ३ मासांनी बर्‍यापैकी गेले. आता ते सनातनच्या साबणासह अन्य सात्त्विक उत्पादनेही वापरत आहेत.

वंदनामावशींनीही त्यांच्या घरात सनातनची उत्पादने वापरायला लागल्यापासून घरातील वातावरण शांत झाल्याचे अनुभवले आहे. गुरुदेवांनी दिलेल्या या अनुभूतीबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. नयना हृषिकेश कुळकर्णी, सिंहगड रस्ता, पुणे. (१३.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक