रुग्णाईत मुलाच्या शस्त्रकर्मासंदर्भात फोंडा (गोवा) येथील श्रीमती जयश्री मुळे यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

‘सनातन संस्थेच्या’ फोंडा, गोवा येथील साधिका श्रीमती जयश्री मुळे (वय ७८ वर्षे) यांचा थोरला मुलगा सुजित रुग्णाईत असतांना, तसेच त्याच्या हृदयाचे शस्त्रकर्म करतांना त्यांनी पदोपदी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा अनुभवली. त्याविषयी त्यांचे हृदगत येथे पाहू.

श्रीमती जयश्री मुळे

१. श्री. सुजित यांना वयाच्या १८ व्या वर्षी रक्तदाबाचा त्रास चालू होणे

श्री. सुजित मुळे

‘माझा मुलगा सुजित (वय ५३ वर्षे) याला रक्तदाबाचा (ब्लडप्रेशरचा) त्रास वयाच्या १८ व्या वर्षापासून होता. वर्ष १९८९ मध्ये त्याला रक्तदाब (ब्लडप्रेशर) असल्याचे निदान झाले होते. आम्ही त्याच्यावर पुष्कळ उपचार करत होतो; परंतु लवकर फरक पडला नाही.

२. प.पू. (कै.) श्रीमती शकुंतला पेठेआजी यांनी श्री. सुजित यांना पहाताच ‘त्याला त्रास आहे’, असे साधिकेला सांगणे

वर्ष २००५ मध्ये सनातनच्या प.पू. (कै.) श्रीमती शकुंतला पेठेआजी संभाजीनगरला आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी सुजितला पाहिले. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुझ्या मुलाला त्रास आहे. त्याची काळजी घे.’’ त्यानंतर मी सुजितला संभाजीनगर येथे हृदयरोग तज्ञांकडे घेऊन गेले. (प.पू. (कै.) पेठेआजी यांनी वर्ष २००८ मध्ये देहत्याग केला. – संकलक)

३. वास्तूतज्ञ आणि ज्योतिषी यांनी हृदयाच्या त्रासासाठी सूर्याेपासना, तसेच साडेसाती निवारणासाठी पंचमुखी हनुमत्कवचाचे पठण करण्यास सांगणे

वर्ष २०११ मध्ये आमच्याकडे रहाणारे मद्रासी ज्योतिषी यांनी त्यांच्यासमवेत काही वास्तूतज्ञ आणि ज्योतिषी यांना आणले होते. त्यांनी सुजितची पत्रिका पाहून सुजितला हृदयाचा त्रास असल्याने आदित्यहृदय स्तोत्राचा पाठ करण्यास सुचवले, तसेच सुजितला साडेसाती चालू असल्याने पंचमुखी हनुमत्कवचही म्हणायला सांगितले. त्याला त्या वेळी पुष्कळ त्रास होत होता. अशा अनेक जणांच्या माध्यमातून गुरुदेव त्याची काळजी घेत होते.

४. त्रासाच्या स्थितीतही श्री. सुजित यांनी नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करणे

त्या काळात तो ५० ते ६० दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ३० साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत होता. यावरून ‘त्याच्यावर गुरुदेवांची किती कृपा होती !’, हे माझ्या लक्षात येते. हे सर्व आठवल्यावर माझी पुष्कळ भावजागृती होते.

५. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे लक्षात आल्याने श्री. सुजित यांचे शस्त्रकर्म करावे लागणे

ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याचा रक्तदाब आणि नाडी पडताळतांना नाडीचे प्रतिमिनिट ठोके पुष्कळ न्यून, म्हणजे साधारण ४५ – ५० असल्याचे लक्षात आले. (सर्वसाधारण व्यक्तीच्या नाडीचे ठोके प्रतिमिनिट ६० ते ९० या दरम्यान असतात.) पुढील पडताळणीसाठी सुजितला आधुनिक वैद्य सावईकर यांच्याकडे पाठवले. हृदयस्पंदनालेख (ई.सी.जी.) काढल्यावर त्यातील अनियमितता लक्षात येऊन सुजितची ‘अँजिओग्राफी’ करण्याचे ठरले. ६.१.२०२३ या दिवशी त्याची ‘अँजिओग्राफी’ केली. त्यामध्ये मात्र त्याला तीन ९० ते १०० टक्क्यांचे ‘ब्लॉकेज’ (रक्तवाहिन्यांतील अडथळे) आहेत, असे निदान झाले. तेव्हा ‘शस्त्रकर्म करण्याविना पर्याय नाही’, असे आमच्या लक्षात आले.

– चरणदासी,

(क्रमश:)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा    https://sanatanprabhat.org/marathi/ 839152.html

श्रीमती जयश्री मुळे (वय ७८ वर्षे), फोंडा, गोवा. (१३.२.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक