राष्‍ट्र आणि धर्म यांचा प्रखर अभिमान असलेले अन् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी अपार भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) ! 

 ‘मी सनातन संस्‍थेच्‍या कार्यानुषंगाने मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्‍ह्यांतील काही सेवा करत होतो. तेव्‍हा माझा भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (आबा) यांच्‍याशीही संपर्क आला. मला त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

१५ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘साधी रहाणी, काटकसरीने संसार करणे, वक्‍तृत्‍व कौशल्‍य आणि राष्‍ट्र अन् धर्म यांचा प्रखर अभिमान असणे’, ही गुणवैशिष्‍ट्ये वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. (हे लिखाण प्रा. सु.ग. शेवडे संत होण्‍यापूर्वीचे आहे. – संकलक)

 मागील भाग येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/804124.html

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

८. सनातन संस्‍थेविषयी असलेला जिव्‍हाळा !

८ अ. सनातन संस्‍थेचा सन्‍मान करणे : ‘सनातन संस्‍था ही समाजात प्रामाणिकपणे आणि निःस्‍वार्थ भावाने अध्‍यात्‍मप्रसार अन् धर्मजागृती करणारी सेवाभावी संस्‍था आहे’, हे आबांनी जाणले. त्‍यामुळे ते सनातन संस्‍थेला नेहमी सहकार्य करत असत. त्‍यांचा देश-विदेशातील बर्‍याच हिंदू संघटना आणि संप्रदाय यांच्‍याशी संबंध आला; मात्र त्‍यांना सनातन संस्‍था अन् सनातनचे साधक यांच्‍याविषयी विशेष आपुलकी आहे. आबांनी त्‍यांच्‍या अमृत महोत्‍सवाच्‍या वेळी सनातन संस्‍थेचा सन्‍मान केला होता.

पू. शिवाजी वटकर

८ आ. ‘सनातन प्रभात’वरील विश्‍वास ! : ते प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतात आणि संदर्भासाठी आवश्‍यक ते अंक संग्रही ठेवतात.

८ इ. सनातन संस्‍थेला केलेले साहाय्‍य !

१. ते सनातन संस्‍थेकडून कसलीही अपेक्षा न करता हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा किंवा गुरुपौर्णिमा यांसाठी वक्‍ता म्‍हणून विनामूल्‍य मार्गदर्शन करत असत.

२. सनातनच्‍या एका आश्रमाच्‍या संदर्भातही त्‍यांनी संस्‍थेला पुष्‍कळ सहकार्य केले आहे.

९. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती असलेला अपार भाव !  

‘गजानन महाराज’ आणि इंदूरचे ‘प.पू. नाना महाराज तराणेकर’ हे आबांना गुरुस्‍थानी आहेत. आबांचा अनेक सत्‍पुरुष, साधू आणि संत यांच्‍याशी संपर्क आला आहे, तरीही आबांच्‍या हृदयात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी अपार आदरभाव आहे. आबा म्‍हणतात, ‘‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेला रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम हा स्‍वर्ग आहे. इथे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या रूपात साक्षात् परमेश्‍वर रहातो. त्‍यांचा अध्‍यात्‍मात मोठा अधिकार आणि मान आहे. असे असूनही ते साधेपणाने रहातात आणि बोलतात. त्‍यांनी स्‍थापन केलेली ‘सनातन संस्‍था आणि तिचे कार्य’ हे सर्वकाही अद़्‍भुत आहे. असे मी जगात कुठेही पाहिलेे नाही.

आता मी सर्वाधिक आनंदी आहे; कारण माझ्‍या आयुष्‍याच्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यात गुरुदेवांनी मला इकडे आश्रमातच रहायला बोलावले आहे. ते माझ्‍याकडून सेवा करून घेत आहेत.’’

१०. कृतज्ञता

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने मला भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांच्‍याकडून पुष्‍कळ शिकता आले. त्‍यासाठी मी भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.६.२०२४)