सरकारकडून ‘वक्फ बोर्ड’ला निधी देण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी ! – दीपक देसाई, जिल्हाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन, कोल्हापूर

कोल्हापूर – काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात संमत झालेल्या १० कोटी रुपयांपैकी २ कोटी रुपये सध्याच्या सरकारने ‘वक्फ बोर्डा’ला दिले. हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणार्‍या सरकारकडून ‘वक्फ बोर्ड’ला निधी देण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असून हिंदु एकता आंदोलन याचा निषेध करते. वास्तविक ‘वक्फसारखी’ मुस्लीम तुष्टीकरण करणारी व्यवस्था भारतात असणे ही शोकांतिका आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जो विजयोत्सव साजरा करण्यात आला, त्यात हिरवे झेंडे फिरवले गेले, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या त्याचेच बक्षीस बहुतेक सरकारने दिले असावे, असे मत प्रसिद्धीपत्रकाद्वारे हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई यांनी व्यक्त केले आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मतांसाठी अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करत असे. यानंतर आता हिंदुहृदयसम्राट यांचे पुत्र श्री. उद्धव ठाकरेही या चिखलात उतरले आणि महायुती सरकारही आता त्याच वाटेवर जात आहे. त्यामुळे सगळीकडे मुस्लीम तुष्टीकरणाची स्पर्धा चालू आहे, असे वाटते. या चिखलामुळे एक दिवस देश उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. ‘वक्फ बोर्डा’ला निधी देण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा; अन्यथा सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना मोठे आंदोलन उभे करतील आणि त्यात सामान्य हिंदूही सहभागी होईल. अल्पसंख्यांक मतांच्या लाचारीच्या चिखलातून हे सरकार आणि सगळेच राजकीय पक्ष लवकर बाहेर पडू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !