Maharashtra ‘Tipu Sultan Party’ Got Votes : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवून ‘टिपू सुलतान’ पक्षाने मिळवली शेकडो मते !

मुंबई, १४ जून (वार्ता.) – क्रूरकर्मा टिपू सुलतानाच्या नावाने कार्यरत असलेल्या ‘टिपू सुलतान पार्टी’ने महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढवून ९७८ मते मिळवल्याचे निवडणुकीच्या निकालातून उघड झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून या पक्षाने महाराष्ट्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘टिपू सुलतान पार्टी’ हा भारतीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला पक्ष आहे.

जावेद सलीद सय्यद यांनी ‘टिपू सुलतान पार्टी’च्या माध्यमातून ही निवडणूक लढवली. जून २०१९ पासून हा पक्ष कार्यरत आहे. प्रा. शेख सादेक हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भारताला महासत्ता बनवणे, देशाला मद्यमुक्त करणे, देशातून जातीयवाद हद्दपार करणे आदी उद्दिष्टे दाखवून या पक्षाचे कार्य विविध सामाजिक उपक्रमांतून महाराष्ट्रात चालू आहे. अल्पसंख्यांक आणि दलित समाज यांच्या हितासाठी कार्यरत असल्याचे या पक्षाकडून घोषित करण्यात आले आहे.

जावेद सलीद सय्यद यांनी ‘टिपू सुलतान पार्टी’च्या माध्यमातून निवडणूक लढवली.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) या कायद्यांना विरोध !

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) यांना या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. महाराष्ट्रातही या पक्षाचे कार्य काही प्रमाणात आहे. बीड जिल्ह्यात टिपू सुलतान ब्रिगेड ही संघटना मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये या पक्षाचा उमेदवार उभा करण्यात आला होता. एक ‘आदर्श बादशहा’ म्हणून या पक्षाकडून टिपू सुलतानाचे उदात्तीकरण केले जात आहे.

बादशाह नव्हे, ‘जिहादी’ टिपू सुलतान !

म्हैसुरू येथील हिंदु राजांच्या सैन्यामध्ये अधिकारी असलेल्या हैदर अली याने कपटाने त्यांचे राज्य बळकावले. हैदर अली याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र टिपू सुलतान याच्याकडे म्हैसुरूचे हिंदु संस्थान आले. हाती सत्ता येताच टिपूने भर सभेत सर्व काफिरांना (हिंदूंना) मुसलमान करण्याची प्रतिज्ञा केली. त्याच्या लेखी आदेशाने गावेच्या गावे इस्लामी करण्यात आली. ज्या हिंदूंनी स्वेच्छेने इस्लाम स्वीकारला नाही, त्यांची बलपूर्वक सुंता करण्यात आली आणि हिंदु स्त्रियांना मुसलमानांमध्ये वाटण्यात आले. टिपूने मलबारमध्ये १ लाख हिंदूंचे धर्मांतर केले. टिपूच्या राज्यात ८ सहस्रांहून अधिक मंदिरे पाडण्यात आली. त्याने ४० लाख हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले.

संपादकीय भूमिका

हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा ‘टिपू सुलतान’ याच्या नावाचा पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात असणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल !