जुन्नर (जिल्हा पुणे) – पारुंडे (तालुका जुन्नर) येथे अल्पवयीन मुलींची छायाचित्रे काढणार्या महंमद तौसिफ इलियास शेख या धर्मांध तरुणाला ग्रामस्थांनी चोप देऊन जुन्नर पोलिसांच्या कह्यात दिले. तो भ्रमणभाषमध्ये अल्पवयीन मुलींच्या नकळत चोरून छायाचित्रे काढत असे, तसेच पाठलाग करून त्यांच्याशी अश्लील वर्तन करत होता. या प्रकरणी पारुंडे गावाचे सरपंच जयेश पुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुन्नर पोलिसांनी तौसिफ यास कह्यात घेतले. शेख याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
शेख यास गावातील लोकांनी पकडले असता त्याच्या भ्रमणभाषमध्ये गावातील आणि अन्य ठिकाणच्या मुलींची छायाचित्रे काढलेली आढळून आले. याविषयी त्याला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला पोलिसांच्या कह्यात दिल्याचे सरपंच पुंडे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाअशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्यासच इतरांवरही जरब बसेल ! |