महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना ही मोठ्या प्रमाणात गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक, तसेच हत्या केली जात आहे. हिंदूंच्या सणांच्या दिवशीच गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्करीच्या समस्येची भीषणता किती आहे ? याची कल्पना येते. गोवंशहत्या बंदी कायदा करून अनेक वर्षे झाली. शासकीय यंत्रणा गोहत्या, गोतस्करी आणि अवैध पशूवधगृहांवर प्रतिबंध कधी लावणार आहेत ?
गोवंशियांची हत्या करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यानंतरच असे प्रकार थांबतील. पोलीस केवळ जुजबी कारवाई करत असल्याने धर्मांध पुन्हा गोवंशियांची कत्तल करतात, हे पोलिसांच्या कसे लक्षात येत नाही ?
२१ एप्रिल या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरात शिवराईकडे जाणार्या भारतनगर वसाहतीत बंदी असतांनाही गोवंशियांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करणार्या संशयिताला पोलिसांनी पकडले, तसेच २ टन गोमांस आणि वाहतूक करणारे वाहन असा ७ लाख रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी आरोपी इमरान उस्मान कुरेशी आणि अहमद कुरेशी या दोघांवर महाराष्ट्र प्राणीरक्षण (सुधारणा) कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथेही पोलिसांनी २१० गुरांची कातडी पकडली आहे.
बेळ्तंगडी (कर्नाटक) येथील बेकायदा पशुवधगृहावर धाड घालून पोलिसांनी ८७ किलो गोमांस कह्यात घेतले. या प्रकरणी बद्रुद्दीन, अब्दुल रहमान, खलील आणि इक्बाल या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. ही घटना बेळ्तंगडी तालुक्यातील कुवेट्टू गावात असलेल्या आरमले बेट्ट येथे घडली. या वेळी विकण्यासाठी गोळा करून ठेवलेले अनुमाने ८७ किलो गोमांस, तसेच त्यासाठी वापरलेली हत्यारे कह्यात घेण्यात आली.
२९ मार्च या दिवशी हासन (कर्नाटक) पोलिसांनी येथे १० सहस्र किलो गोमांस जप्त केले. यासाठी ६० हून अधिक गायींच्या हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या वेळी येथून ५ गायींना वाचवण्यात आले. अनेक गायींची हत्या करून त्यांचे रक्त येथील तलावात सोडण्यात आले होते. पोलिसांनी येथे धाड घातल्यावर आरोपी पळून गेले.
२९ मार्च या दिवशी कर्नाटक मधील कडब तालुक्यातील कोयला गावातील केम्मार अकिर येथे चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर धाड घालून ९४ किलो गोमांस जप्त करण्यात आले. येथे ३ गायींची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी इलियास याला अटक केली, तर महंमद आमु हा पसार झाला. इलियास याच्या घरीच हे पशूवधगृह चालवण्यात येत होते.
श्रीरामनवमीला सोलापूर येथील औराद गावाजवळ गोवंशियांची तस्करी करणार्या वाहनाचा पाठलाग करत असतांना गोरक्षकांच्या वाहनाचा अपघात घडवून आणून त्यांच्यावर वाहनचालकाने प्राणघातक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. घायाळ अवस्थेतही गोरक्षकांनी स्थानिक पोलीस आणि इतर गोरक्षक यांच्या साहाय्याने सदर वाहन कह्यात घेतले. यानंतर या गाडीतील ७ गोवंशियांची सुटका करण्यात आली.
ज्यांच्यामुळे मनुष्य आणि अन्य प्राणीमात्र, तसेच निसर्ग यांचे पालनपोषण होते, त्या गोवंशियांच्या संरक्षणासाठी आता ‘प्रोजेक्ट काऊ’ अशा प्रकारचा संरक्षणाचा प्रकल्प संपूर्ण देशात राबवण्याची आवश्यकता !
गोहत्या थांबल्या नाहीत, तर ५ वर्षांनंतर गायी चित्रात पहाव्या लागतील ! – ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
‘ज्या गोमातेने आपल्याला वर्षानुवर्षे दूध दिले, त्या गोमातेच्या मांसाचा व्यापार करणे, हा भारतासाठी कलंक आहे !’ – कै. पश्चिमाम्नाय द्वारका शारदापीठ एवं उत्तराम्नाय ज्योतिष्पीठाचे पूज्य स्वामी श्री स्वरूपानन्द सरस्वतीजी महाराज
गोतस्करीच्या गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचा परवाना रहित करावा ! – प्रशांत परदेशी, मानद पशूकल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य
गोवंशियांची तस्करी केलेली वाहने जप्त केल्यानंतर ती न्यायालयाच्या अनुमतीविना सोडून दिली जात आहेत. त्यामुळे पुन्हा त्याच वाहनांतून गोवंशियांची तस्करी होत आहे. त्यामुळे गुन्ह्यांमध्ये जप्त असलेली वाहने न्यायालयाच्या अनुमतीविना सोडली जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, तसेच एकच वाहन २ किंवा त्याहून अधिक गुन्ह्यांमध्ये वापरल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहनाची अनुमती रहित करण्यात यावी.
गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर जरब बसेल, असा धाक पोलीस निर्माण करणार का ?
पुणे येथे कडनगरवरून कोंढवा येथे १५ मे या दिवशी म्हशींची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती गोरक्षक राहुल कदम यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी थांबले असता एक वाहन कोंढव्याच्या दिशेने भरधाव वेगाने येतांना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून चालक इरफान सौदागर याच्याकडे चौकशी केली असता त्यामध्ये ११ म्हशी आणि १२ रेडकू होते. पोलिसांच्या साहाय्याने म्हशींची सुटका करण्यात आली.
प्रत्येक वेळी गोरक्षण करण्यासाठी गोरक्षकांना पोलिसांना सूचना का द्यावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?
मुंबई येथे ५ मे या दिवशी पहाटे ५.३० वाजता ‘होंडा सिटी’ या चारचाकीतून अतिशय निर्दयतेने २ गायी कोंबून कसाई त्यांना कत्तलीसाठी नालासोपारा (प.) येथील वाजा मोहल्ला येथे घेऊन जात होते. त्यांच्या गाडीचा ‘अखिल भारतीय गोवंश रक्षण आणि संवर्धन परिषदे’च्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला. संतोष भुवन या परिसरातून शेवटी ‘वाझा मोहल्ला’ येथे येऊन नालासोपारा पोलीस ठाण्याला सूचित करण्यात आले. पोलिसांनी वेळेवर येत चारचाकीतील गोवंशांना सुखरूप बाहेर काढून सकवार पशू आश्रम येथे पाठवले. (संबंधितांवर कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का ? पोलिसांच्या अशा निष्क्रीयतेमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि इच्छाशक्तीवर हिंदूंना संशय येतो ! – संपादक)