मुंबई – लोकशाही विकास आघाडीमधील घटकपक्ष म्हणून शिवसेना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राहील. मागील १० वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासामध्ये अग्रेसर राहिला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढील ५ वर्षांतही विकासाचा हा वेग कायम राहील, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एक्स’ खात्यावरून व्यक्त केली.