हिंदु धर्मग्रंथांना होणारा विरोध हा धर्म नष्ट करण्याच्या षड्यंत्राचा भाग हिंदूंनी संघटितपणे मोडून काढणे आवश्यक !
भारतात ‘आर्य विरुद्ध द्रविड’ असा वाद निर्माण करून आणि तो अनेक दशके चघळत ठेवून सनातन असा हिंदु धर्म संपवण्याचे पद्धतशीर षड्यंत्र या ना त्या मार्गाने चालू आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे महर्षि मनु आणि मनुस्मृति यांना होत असलेला विरोध ! महाराष्ट्रात शिक्षणात मनूच्या एका श्लोकावरून थयथयाट करणारे पक्षीय राजकारणाद्वारे स्वार्थ साधण्यासाठी आणि हिंदु धर्म संपवण्यासाठी वाटेल ते करू शकतात. याचेच एक उदाहरण म्हणजे तमिळनाडूतील अण्णा द्रमुक पक्ष. अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्यांची कामे पहाता महाराष्ट्रात मनुस्मृतीला विरोध करणार्यांचा खरा ‘अजेंडा’ सहज लक्षात येतो.
१. श्रीरामाला अत्याचारी आणि वामन अवताराला क्रूर ठरवून स्वतःला बळी राजाप्रमाणे चांगली कामे करत असल्याचे दाखवणारे अण्णा द्रमुक पक्षाचे नेते !
सनातन धर्मावर होणारे आक्रमण नवीन नाही. अण्णा द्रमुक पक्षाला पाठिंबा मिळवण्यासाठी ते एक साधन म्हणून वापरणे आधीपासून चालत आले आहे. ही पद्धत स्वातंत्र्यपूर्व काळातच चालू झाली, ज्या वेळी ई.व्ही. रामस्वामी नायर (पेरियार) ब्राह्मणांच्या विरोधातील भावना भडकावत होते. धर्मांतर करण्यास अनुकूल होण्यासाठी मंदिराची संस्कृती बाजूला करणे, ही ख्रिस्ती धर्मप्रसारकांची नीती द्रविड पक्षांनी अनुसरली. अण्णा द्रमुक पक्षाने ‘आर्य विरुद्ध द्रविड विचारधारा’, असा भेदभाव करण्याचे कार्य सतत लावून धरले. ‘ब्राह्मण जे आहेत ते आर्य आणि बाकी सर्वजण द्रविड’, असे त्यांचे म्हणणे होते. स्टॅलिन यांचे वडील एम्. करुणानिधी यांनी ‘जयललिता ही आर्य आणि त्यांची मैत्रिण सोनिया गांधी ही द्रविड’, असे वेगळेच सूत्र वापरले. त्यांनी तिची (सोनिया गांधी यांची) स्तुती करतांना तिची तमिळ महाकाव्यातील मणिमेखला या पात्राशी तुलना केली.स्टॅलिन
‘तमिळ ब्राह्मण हे जाचक आर्य असून ते खैबर खिंडीमधून भारतात आले’, अशी टीका करूनही समाधान न झाल्याने अण्णा द्रमुक पक्षातील बड्या नेत्यांनी ‘हिंदूंच्या देवता या क्रूर आर्य असून त्यांनी द्रविड लोकांना दाबून ठेवले’, असे म्हणायला आरंभ केला. त्यांच्या विचारसरणीनुसार ‘राम हा जुलमी आर्य होता आणि रावण हा द्रविड असून चांगला होता. विष्णूचा वामन अवतार हा क्रूर आर्य होता, तर महाबली (बळी राजा) हा परोपकारी होता.’ करुणानिधी यांचे महाबलीवर प्रेम होते आणि त्यांनी एप्रिल २०११ मध्ये वेल्लोर येथील सभेत स्वतःची तुलना महाबलीशी केली. त्यांनी म्हटले की, महाबलीप्रमाणे काही शत्रूत्व बाळगणार्या शक्ती त्यांना गरिबांची सेवा करण्यासारख्या चांगल्या कृतीपासून रोखत आहेत. जेव्हा त्यांच्या पक्षातील ए. राजा हे ‘२ जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्यात अडकले होते, तेव्हा हे महाबली त्याच्या साहाय्याला गेले. ‘महाबलीप्रमाणे राजा यांनाही चांगले काही केल्याविषयी शिक्षा झाली आहे’, असा दावा त्यांनी केला.
२. मनु आणि मनुस्मृति यांना विरोध हे हिंदूंच्या विरोधात वापरण्यासाठीचे सोपे साधन आणि त्यापुढील पायरी ‘सामाजिक न्याय’ घोषणेचा वापर !
पुढच्या पिढीतही हे महाबलीविषयीचे प्रेम चालूच राहिले. करुणानिधी यांचे पुत्र एम्.के. स्टॅलिन जनतेला ‘ओणम्’ सणाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशामध्ये द्रविड राजा महाबली या नावाने महाबलीचे आवाहन करत ‘युक्ती वापरून त्याचा पराभव करण्यात आला’, असे म्हटले. ‘ओणम्’ हा उत्सव ‘वामन जयंती’ म्हणून साजरी करण्यास त्यांनी आक्षेप घेतला; परंतु त्या संदेशामध्ये त्यांनी ‘तमिळ संगम’ पुस्तकातील ज्या कवितेचा उल्लेख केला, ती श्रीविष्णूच्या जन्मदिवसाशी संबंधित होती. यावरून त्यांचे तमिळ ग्रंथांचे किती ज्ञान आहे ? हे लक्षात येते. पुढे काही काळाने ‘आर्य विरुद्ध द्रविड’, हे विभाजन करण्यासाठी नवीन संकल्पनांचा उपयोग केला गेला.
२ अ. ‘सामाजिक न्याय’ या शब्दाच्या आधारे जातीजातींत स्वतःच केलेला भेद ! : मनु आणि मनुस्मृति यांना केला जाणारा विरोध हा या कथानकाचा एक उपविभाग होता. ब्राह्मण आणि सर्व हिंदू यांच्या विरोधात वापरण्यासाठी ते सोपे साधन आहे. याच्या पुढची पायरी म्हणजे ‘सामाजिक न्याय’ या घोषणेचा वापर ! या वेळी त्यांना ‘प्राचीन चोल राजे मनुस्मृतीवर हात ठेवून शपथ घेत असत आणि वैवस्वत मनूचे वंशज असल्याचे सांगत असत’, याची त्यांना जाणीव नाही. द्रविड विचारधारा केवळ ‘मनु हा द्रविड लोकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी बाहेरून आलेला आर्य आहे’, असे तुणतुणे लावून धरत आहेत. गेल्या काही दशकांमध्ये मनुवादी आणि इतर असा भेदभाव करून जातीभेद करण्यावर भर दिला गेला. जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करणार्या अण्णा द्रमुक पक्षाने जातीविषयक जाणिवेचे अधिक उच्चारण केले.
२ आ. सनातन धर्म तमिळ लोकांपासून भिन्न ठरवून स्वतःला सामाजिक न्यायाचे मक्तेदार असल्याचे दाखवणे : अण्णा द्रमुक पक्षाने मनुवादींच्या विरोधातील लढ्याचे पुनर्नामकरण करत त्याला ‘सनातन धर्माविरुद्धचा लढा’ असे नाव दिले. आरंभी स्टॅलिन यांना ‘सनातन धर्म’ हा शब्द उच्चारतांना प्रयत्न करावे लागले. प्रारंभी दलित पँथर पक्षाचे प्रमुख थिरूमावलवन यांच्या माध्यमातून सनातन धर्माच्या विरोधात लढा चालू केला; कारण थिरूमावलवन यांनी सनातन धर्मावर टीका करण्याची प्रत्येक संधी घेतांना अतिशय उत्साह दाखवला. डिसेंबर २०२२ मध्ये एका ख्रिस्ती पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते म्हणाले, ‘‘भारत ही भूमी सनातन धर्मामुळे पीडित असून तिथे स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या गोष्टी नाहीत. सनातन धर्म हा संपूर्णपणे भेदभाव करण्यावर आधारित असून मनूने या भेदभावाला कायद्याचे स्वरूप दिले आहे. सनातन धर्म आणि मनुस्मृति यांचा ‘भेदभाव करणे’ हा पाया आहे.’’ तथाकथित ‘सनातन धर्माच्या विरोधातील लढा हा सामाजिक न्यायासाठी लढा’, असे स्वरूप त्याला देण्यात आले. स्टॅलिन यांनी ‘समानता आणि सर्वांना समान संधी (ब्राह्मण सोडून) अन् जाती आणि धार्मिक ओळख असलेल्या समाजाला दाबून टाकणार्या शक्तींना विरोध’ याला आदर्श द्रविड शासन असे नाव दिले.
सनातन धर्म तमिळ लोकांपासून भिन्न आहे; कारण त्यामुळे तमिळ लोकांना त्रास झाला, असे वक्तव्य त्यांनी केले. ते म्हणाले, ‘‘खिलाडी संस्कृती ही तमिळ लोकांचे शाही जीवन दाखवते आणि सनातन धर्म हा जातीच्या आधारे लोकांचे विभाजन करून खालच्या जातीतील लोकांना गुलाम अन् जनावरे यांसारखी वागणूक देतो. कर्नल मुनरो, अय्य वैकुंदर, पेरियार हे समाजसुधारक आणि ख्रिस्ती धर्मप्रसारक ज्यांनी समाजात समानतेविषयी खात्री निर्माण केली, त्यांचे आम्ही ऋणी आहोत. आदर्श द्रविड सत्तेमध्ये आम्ही हा सामाजिक न्याय चालू ठेवून समानतेची खात्री देत असल्याने त्याला काही धार्मिक आणि जातीय धर्मांधाकडून विरोध होत आहे.’’
३. तमिळी जनतेत काल्पनिक भीती निर्माण करून निवडणुकीत विजय मिळवणारा अण्णा द्रमुक पक्ष !
तमिळ साहित्याविषयी चांगली माहिती असलेल्या करुणानिधी यांना ‘थोलकप्पीयम’मधील वर्णव्यवस्थेविषयी माहिती असायला हवी; परंतु त्यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे त्यांनी वर्णव्यवस्थेविषयी भावना भडकावण्याचे काम केले. धार्मिक कारणावरून मतपेढी वाढवणे, हे कदाचित् त्याचे कारण असावे. केंद्रीय राजकारणात नरेंद्र मोदी यांचा प्रवेश झाल्यानंतर हिंदुविरोधी, म्हणजे मोदीविरोधी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात प्रचार चालू झाला. गोध्रा प्रकरणावर न्यायालयाकडून पडदा टाकण्यात आल्यानंतर आता नवीन विषय शोधले पाहिजेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या कडवट भाषेत शाब्दिक आक्रमण करण्यात उदयनिधी स्टॅलिन अग्रेसर झाले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर कल्पना करता येणार नाही, एवढ्या प्रमाणात मोदींच्या विरोधात टीका करणे चालू झाले. या मोदीविरोधी आक्रमणामध्ये उदयनिधी हे सर्वांत पुढे होते. गेल्या विधानसभेच्या प्रचार मोहिमेच्या वेळी ‘नरेंद्र मोदींमुळे अरुण जेटली आणि सुषमा स्वराज्य यांचा मृत्यू झाला’, असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. ते म्हणाले, ‘‘सुषमा स्वराज नावाच्या नेत्या होत्या. मोदींकडून झालेला छळ सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तसेच अरुण जेटली हा नेताही नरेंद्र मोदी यांच्याकडून छळ झाल्याने मरण पावला.’’ ‘तुम्ही आम्हाला मत दिले नाही, तर तमिळनाडूमध्ये मोदी यांचा प्रवेश होईल’, अशी काल्पनिक भीती निर्माण केल्याने त्या निवडणुकीत अण्णा द्रमुक पक्ष आणि काँग्रेस यांचा दणदणीत विजय झाला. सत्तेवर येण्यासाठी अल्पसंख्याकांनी साहाय्य केल्याविषयी त्यांना धन्यवाद देण्यात अण्णा द्रमुक पक्षाला कोणतीही शंका नव्हती.
जुलै २०२२ मध्ये त्रिची येथील सेंट पॉल विद्यालयाच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये तमिळनाडू विधानसभेचे सभापती अप्पावू यांनी ‘अण्णा द्रमुक पक्षाचे सरकार आम्ही सिद्ध केले. ख्रिस्ती धर्मप्रसारक नसते, तर तमिळनाडूचे बिहारमध्ये रूपांतर झाले असते’, असे वक्तव्य केले.
४. अल्पसंख्यांकांना स्वतःकडे वळवण्यासाठी सनातन हिंदु धर्मावर टीका
एप्रिल २०२३ मध्ये भाजपचे आमदार वनाथी यांनी हिंदु धर्मातून इतर धर्मांत धर्मांतर केलेल्यांना आरक्षण देण्याच्या ठरावाला विरोध केला. अशा आरक्षणामुळे त्या धर्मामध्ये जातीयता आणि अस्पृश्यता निर्माण होईल, हे त्यांचे म्हणणे सभापती अप्पावू यांनी ग्राह्य धरले नाही. ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांचे कौतुक अन् याउलट हिंदु धर्माविषयी द्वेष असल्याचे अण्णा द्रमुक पक्षाचे प्रमुख आणि त्यांचे सुपुत्र यांनी दाखवून दिले. जातीय भेदभाव, धार्मिक प्रथांचा उपहास करणे आणि धार्मिक स्थळांचा गैरवापर हे इतर धर्मांना सोडून केवळ हिंदु धर्मालाच लागू झाले. या संदर्भात उदयनिधी यांच्याकडून अत्यंत हीन दर्जाचे शब्द वापरण्यात येत आहेत. त्यांनी यातून राष्ट्रपतींनाही सोडले नाही. ‘राष्ट्रपती मुर्मू या विधवा असल्याने त्यांना नवीन संसदेच्या उद्घाटन समारंभाला बोलवले नाही’, असा दावा त्यांनी केला. विलक्षण म्हणजे त्यांच्या शपथविधी घेण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांची आजी (करुणानिधी यांची पत्नी) उपस्थित नव्हती. याचे कारण काय असू शकते ?
हिंदु धर्मावर कडवट टीका करण्यामागच्या सत्याचा ते मानत असलेल्या धर्माशी संबंध असू शकतो. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्या मतदारसंघात ख्रिसमसच्या वेळी बोलतांना त्यांनी ते स्वतः ख्रिस्ती असून त्यांनी ख्रिस्ती मुलीशी विवाह केल्याचे सांगितले. त्यांनी स्वतः ख्रिस्ती असल्याचे घोषित करून ‘या ख्रिस्ती उत्सवात सहभागी झाल्याविषयी आनंद झाला’, असे वक्तव्य केले. एकीकडे भारतीय घटनेनुसार एक मंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा उदयनिधी त्यांनी ‘सर्व धर्मांना मानतो’, असे म्हणत दुसरीकडे हिंदू आणि त्यांचा धर्म यांविषयी ते आक्रमक झाले. त्यांच्या आणि अण्णा द्रमुक पक्षाच्या दृष्टीने सनातन धर्मावर आक्रमण करणे, म्हणजे भाजपच्या विरोधात काहीतरी करणे असे आहे. याचा हिंदूंच्या भावनांवर काय परिणाम होईल ? याची काळजी त्यांना नाही; कारण आतापर्यंत मतपेट्यांमधून हिंदूंनी कधी याचा सूड घेतलेला नाही. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये त्या पक्षाला आलेले अपयश हे भ्रष्टाचार केल्यामुळे किंवा एम्.जी.आर्. किंवा जयललिता यांचा प्रचंड प्रचार झाल्यामुळे आलेले आहे. तमिळनाडूमधील हिंदूंनी हिंदु धर्माचा विरोध करणार्यांना कधीच शिक्षा दिलेली नाही.
अण्णा द्रमुक पक्षाला काही पिढ्यांपासून समर्थन करणारे आहेत; परंतु निवडणुकीत विजयी होण्यासाठी तेवढे पुरेसे नाही. त्यामुळे ते अल्पसंख्यांकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘हिंदु धर्माच्या विरोधात पवित्रा घेतल्याने हे चांगल्या रितीने होऊ शकते’, असे त्यांना वाटते. त्यामुळे मुसलमानांचे विवाह समारंभ आणि ख्रिस्त्यांचे समारंभ यांमधून हिंदूंच्या विरोधात टीका करण्याची संधी घेतली जात आहे; परंतु राजकारणात नेहमी नवीन खाद्य लागते; म्हणून हुकूमाचे पान म्हणून उदयनिधी यांनी ‘सनातन धर्म नष्ट केला पाहिजे’, असे वक्तव्य केल्यानंतर ‘त्यांना अटक करण्याचे धारिष्ट्य केंद्राने दाखवावे’, असे वक्तव्य केले. आणीबाणीच्या काळात ‘मिसा’ कायद्याखाली कुणालाही अटक न झाल्याविषयी प्रतिष्ठेचा दावा त्यांचे पिता करत आहेत. या सिंहासनाचे वारस म्हणून या कारणासाठी काहीतरी त्याग केला, असे उदयनिधी दाखवू पहात आहेत. त्यांना आव्हान देऊन अटक व्हावी आणि द्रविड आदर्शांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी ‘हुतात्मा’ ही पदवी दिली गेल्यास त्यांना आनंदच होईल.
सनातन धर्माला शिव्या दिल्याने ‘इंडि’ आघाडीमधील इतर पक्षांवर काय परिणाम होईल ? याची अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्यांना पर्वा नाही. तमिळनाडू हे त्यांचे घरचे मैदान आहे आणि कोणतीही किंमत देऊन त्यांना ते राखून ठेवायचे आहे. विरोधी पक्षातील त्यांच्या भागीदारांना त्यांच्या अभूतपूर्व लढ्यात अण्णा द्रमुक पक्ष जमेची बाजू न ठरता लंगडी बाजू ठरेल, याची जाणीव झाली पाहिजे.
– जयश्री सारानाथन (साभार : ‘एमिसंस्कृती’ संकेतस्थळ)