Withdraw Case Against Sharan Pumpwell : विहिंपचे नेते शरण पंपवेल यांच्या विरोधातील गुन्हा मागे घ्या !

  • मंगळुरू (कर्नाटक) येथे रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना चेतावणी दिल्याचे प्रकरण

  • विश्‍व हिंदु परिषदेची राज्यपालांकडे मागणी

मंगळुरू – कंकनाडी मशिदीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना सामाजिक माध्यमांतून चेतावणी दिल्याच्या प्रकरणी विश्‍व हिंदु परिषदेचे (विहिंपचे) नेते शरण पंपवेल यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी विहिंपने  विहिंपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपालांकडे एका निवेदनाद्वारे केली.

या वेळी विहिंपचे  जिल्हाध्यक्ष श्री. एच्.के. पुरुषोत्तम, प्रांत सहसेवा प्रमुख गोपाल कुत्तार, रवी असैगोळी, गुरुप्रसाद आणि नवीन मूडुशेड्डे उपस्थित होते. ‘या प्रकरणी सक्तीच्या सुटीवर (रजेवर) पाठवण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍याची सक्तीची सुटीही रहित करावी’, अशीही मागणी विहिंपने केली आहे.

शरण पंपवेल

काय आहे प्रकरण ?

मंगळुरू शहरातील काही धर्मांधांनी कंकनाडी मशिदीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर नमाजपठण केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणाची स्वतःहून नोंद घेऊन गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना तडकाफडकी सक्तीच्या सुटीवर पाठवण्यात आले. यासह या घटनेनंतर ‘रस्त्यात पुन्हा नमाजपठण केले, तर बजरंग दल कार्यवाही करेल’, असा सामाजिक माध्यमांतून चेतावणी देणारे विश्‍व हिंदु परिषदेचे प्रमुख शरण पंपवेल यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला.