Surbhi Khatun Arrested : गुदाशयात १ किलो सोने लपवून तस्करी करणार्‍या सुरभी खातून या हवाईसुंदरीला अटक !

मस्कत (ओमान) येथून भारताकडे येत होते विमान !

कन्नूर (केरळ) – येथे ‘एअर इंडिया’ विमानाच्या हवाईसुंदरीला १ किलो सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तिने तिच्या गुदाशयात हे सोने लपवले होते. सुरभी खातून असे तिचे नाव असून महसूल गुप्तचर संचालनालयातील अधिकार्‍यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर खातून हिला अटक करण्यात आली.

पोलीस चौकशीत तिने अशा प्रकारे अनेक वेळा सोन्याची तस्करी केल्याचे समोर आले. यामध्ये विमानातील अन्य कर्मचारीही सहभागी असू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे अन्य अटकाही होऊ शकतात. याआधीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

सोन्याच्या तस्करीचे असे प्रकार वारंवार घडत असून त्यावर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा काय पावले उचलणार ?