MP Love Jihad : आबिद खानने विवाह ठरलेल्या एका हिंदु युवतीच्या कुटुंबियांना केली अमानुष मारहाण !

  • अशोक नगर (मध्यप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’ !

  • पीडितेवर अनेक वेळा केला होता बलात्कार, विवाह ठरल्यावरून कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !

अशोक नगर (मध्यप्रदेश) – आबिद खान नावाच्या एका युवकाने २२ वर्षीय हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केले. बलात्काराचा व्हिडिओही बनवला. पुढे तिचा विवाह दुसर्‍या तरुणाशी निश्‍चित झाल्यानंतर आबिद खानने काही मित्रांसह तलवारीचा धाक दाखवत घरातून मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पीडितेचे वडील आणि भाऊ यांनी या टोळीला विरोध केला असता आबिद खानने पीडितेच्या वडिलांचा एक पाय आणि भावाचा एक हात तोडला, तसेच आईलाही अमानुष मारहाण केली. कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने परिसरातील लोकांनी मुसलमान गुंडांना धमकावले. वाढती गर्दी पाहून ते मुलीला सोडून पळून गेले. (अशा प्रकारे हिंदु कुटुंब असुरक्षित असायला हा भारत आहे कि पाकिस्तान ? – संपादक)

१. मुलीच्या कुटुंबियांना आणि तिच्याशी साखरपुडा झालेल्या मुलाच्या कुटुंबालाही धमकावण्यात आले आहे. या वेळी आबिद आणि अन्य गुंडांनी तलवारी अन् लोखंडी रॉड आणले होते.

२. मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनीत कुमार जैन यांनी दिली आहे. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ !

या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली जात होती. यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दबाव आणल्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे; परंतु यासाठी पीडित कुटुंबाला ६-७ घंटे पोलीस ठाण्यात थांबावे लागले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंदवण्यात आला. (मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना तेथील पोलिसांकडून अशा प्रकारे हिंदूंवरील अत्याचारांची प्रकरणे हाताळली जाणे हिंदूंना अपेक्षित नाही ! अशा पोलिसांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही गेल्या महिन्याभरात लव्ह जिहादच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांत हिंदु युवती अथवा तिचे कुटुंबीय यांच्यावर आक्रमण करण्यात आले अथवा त्यांचे अपहरण झाले आहे. अशा घटना रोखण्यासाठी मध्यप्रदेश पोलीस काय करत आहेत ?