सातारा, ३० मे (वार्ता.) – येथील वीज विभागांतर्गत कंत्राटी वीज कामगारांनी कंत्राटदाराच्या विरोधात तक्रार केली होती. याचा आकस मनात धरून महावितरण आस्थापनातून काढून टाकलेल्या ६ कंत्राटी वीज कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश सातारा मंडलचे अधीक्षक अभियंता अमित बारटक्के यांनी संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत. ही माहिती ‘महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा’चे अध्यक्ष नीलेश खरात यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली. एका संस्थेच्या या कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केली होती. तक्रार कारणार्या कामगारांना त्या संस्थेने कामावरून काढून टाकले होते. याविषयी कामगार संघटनेने नायब तहसीलदार, मुख्यमंत्री सचिवालय यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.