मिरज येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अभिवादन करतांना हिंदुत्वनिष्ठ

मिरज, ३० मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने २८ मे या दिवशी ज्वलंत हिंदुत्व विचारांचे ‘युगपुरुष’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी सर्वश्री मकरंद देशपांडे, मोहन वाटवे, रोहित चिवटे, तानाजी घार्गे, अधिवक्ता वासुदेव ठाणेदार, सुमेध ठाणेदार, सौ. रूपाली देसाई, भैय्या खाडीलकर, शंकर इसापुरे, सुहास दिवेकर आणि अन्य अनेक जण उपस्थित होते.

हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने सावरकरांना अभिवादन !

हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने सावरकरांना अभिवादन करतांना हिंदुत्वनिष्ठ

ज्वलंत हिंदुत्व विचारांचे ‘युगपुरुष’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदु एकता आंदोलन मिरज शहराच्या वतीने २८ मे या दिवशी हिंदु एकता आंदोलनाचे मिरज शहराध्यक्ष श्री. सोमनाथ गोटखिंडे, कार्यकर्ते सर्वश्री दत्ता भोकरे, किरण माळी, प्रथमेश कोरे, महेश आयतवडे, राहुल पवार, राजू रसाळ, रजपुत, सुनील कापसे, ‘दत्त चौक रिक्शा मंडळ’ यांनी सावरकरांच्या स्मारकाला पुष्पहार घालून जयंती साजरी केली.