आरोपी महिलेचे जामीन आवेदन उच्च न्यायालयाने फेटाळले !

नागपूर येथील अपघाताचे प्रकरण

नागपूर – २५ फेब्रुवारी या दिवशी शहरातील मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुला येथे एका चारचाकीने दोन युवकांना धडक देऊन त्यांना ठार केले. या प्रकरणी उच्च न्यायालयाने आरोपी रितिका उपाख्य रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अमान्य केला. यामुळे आता आरोपी महिलेला अटक होणार, हे निश्चित झाले आहे. मागील आठवड्यात नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानेही तिचे अटकपूर्व जामीन आवेदन फेटाळले होते. यानंतर रितिकाने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आवेदन केले होते. तिच्या जामीन आवेदनावर अवकाशकालीन न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली.