इंदूर (मध्यप्रदेश) – येथील न्यायालयात महंमद सलीम याने न्यायाधिशांवर चपलांचा हार फेकला. यानंतर लगेचच येथे उपस्थित नागरिक आणि अधिवक्ते यांनी सलीमला पकडून चोपले अन् पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर न्यायालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. विशेष म्हणजे या न्यायालयात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. (न्यायालयात यापूर्वी अशा घटना घडूनही पोलीस त्यादृष्टीने सतर्क का नव्हते ?, असा प्रश्न उपस्थित होतो. – संपादक)
या न्यायालयात २ मौलवींच्या (इस्लामच्या धार्मिक नेत्यांच्या) संदर्भातील एका खटल्यावर निकाल येणार होता. जे न्यायाधीश निकाल देणार होते, त्यांच्यावरच चपलांचा हार फेकण्यात आला. सलीम याने घरातून चपलांचा हार आणला होता. ‘तो हार सुरक्षा कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांना दिसला नाही का ?’, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ‘सलीमच्या पिशवीची झडती का घेण्यात आली नाही ?’, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
संपादकीय भूमिकान्यायालयातील सुरक्षेचे तीन तेरा ! चपलांच्या जागी प्राणघातक शस्त्र असते, तर काय झाले असते ? या प्रकरणी संबंधित पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे ! |