‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या विरोधातील पत्रकार परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान !
मुंबई – जी व्यक्ती मला एका मुसलमान व्यक्तीच्या घरात त्याची १० मुले दाखवेल, त्या व्यक्तीला मी ११ लाख रुपयांचे पारितोषिक देईन. मुळात आता असे कुठेही नाही. लोकांमध्ये अपसमज निर्माण केला जात आहे ? हिंदु, मुसलमान, शीख किंवा बौद्ध या धर्मांच्या धार्मिक पुस्तकांमध्ये असे कुठेही काहीही लिहिलेले नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या विरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘काही लोक देवाच्या पुस्तकाची मोडतोड करू पहात आहेत. कुराण हे देवाचे पुस्तक असून त्यातील माहिती खोट्या पद्धतीने मांडून चित्रपट काढून या लोकांना आनंद मिळतो. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने दायित्वाने काम करायला हवे. या चित्रपटावर बंदी घालावी.’’
संपादकीय भूमिका
|