Israel Hamas War : इस्रायलच्या प्रत्युत्तरात गाझामध्ये ३५ जणांचा मृत्यू  

हमासने इस्रायलवर पुन्हा रॉकेट डागले

तेल अविव (इस्रायल) – ४ मासांनंतर हमासने इस्रायलवर पुन्हा रॉकेट डागल्यावर इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात गाझापट्टीत ३५ जणांचा मृत्यू झाला. गाझातील निर्वासितांच्या छावण्यांवर हवाई आक्रमण करण्यात आले. मृतांमध्ये बहुतांश मुले आणि महिला यांचा समावेश आहे. या आक्रमणात १२ हून अधिक जण घायाळ झाले आहेत.

‘इस्रायल डिफेन्स फोर्स’ने आक्रमण केल्याच्या घटनेला दुजोरा दिला. या दलाच्या म्हणण्यानुसार त्यांनी राफामधील हमासच्या कंपाऊंडवर आक्रमण केले. येथे काही काळापूर्वी हमासचे आतंकवादी काम करत होते.

२६ मेच्या सायंकाळी हमासच्या अल्-कासिम ब्रिगेडने इस्रायलची राजधानी तेल अविवमध्ये रॉकेटचा मारा केला होता. यानंतर इस्रायली सैन्याने गाझामध्ये ८ रॉकेट डागले.