सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी जळगाव येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. छाया भोळे

१ अ. ब्रह्मोत्सवाला जातांना प्रवासात जाणवलेले सूत्र

१. प्रवासात सर्व साधक एकत्रित असल्यामुळे शांतता वाटत होती आणि माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू होते. इतर ठिकाणी प्रवास करतांना मला पुष्कळ शारीरिक आणि मानसिक थकवा येतो; पण या वेळी मला थकवा आला नाही. ‘गुरुदेव पुष्कळ चैतन्य देत आहेत’, असे मला जाणवत होते.

१ आ. ब्रह्मोत्सव पहातांना जाणवलेली सूत्रे

१. सगळ्यांनी सूर्यदेवतेला प्रार्थना केली, तेव्हा पुष्कळ थंडगार हवा आली. तेव्हा ‘तेथे सर्व देवता उभ्या आहेत’, असे मला वाटले.

२. परात्पर गुरु डॉक्टरांचा रथ पटांगणात आल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मला रथामध्ये पुष्कळ पांढरा प्रकाश दिसत होता. तेव्हा ‘कार्यक्रम पृथ्वीवर होत नसून देवलोकात चालू आहे’, असे वाटले.

३. तिन्ही गुरूंना (परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना) एकत्रित पाहून पुष्कळ कृतज्ञता वाटली.

४. साधिकांनी गुरुदेवांसमोर नृत्य केले. त्या वेळी माझ्या अंगावर पुष्कळ रोमांच आले. तेव्हा ‘प्रत्येक साधिकेच्या समवेत एक कृष्ण आहे’, असे मला वाटले.

(सर्व सूत्रांचा दिनांक (१५.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक