Muslims Attack On Karnataka Police : अटकेतील आरोपीचा मृत्यू झाल्याने मुसलमानांचे पोलीस ठाण्यावर आक्रमण

  • दावणगेरे (कर्नाटक) येथील घटना

  • ११ पोलीस घायाळ

  • पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ

मुसलमानांच्या जमावाचे पोलीस ठाण्यावर आक्रमण

दावणगेरे (कर्नाटक) – येथील चन्नागिरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जुगाराच्या प्रकरणी आदिल नावाच्या तरुणाला अटक केली होती. अटकेनंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेल्यावर त्याचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या मुसलमानांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. यात ११ पोलीस घायाळ झाले. आक्रमण करणार्‍या मुसलमानांनी पोलिसांवर प्रथम दगडफेक केली. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनांची जाळपोळ केली. यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. आदिलच्या मृत्यूच्या प्रकरणी २ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या पोलीस ठाण्याच्या भागात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे आरोपींना ओळखून त्यांच्यावर कारवाई करत आहेत.

आदिलचा पोलीस कोठडीत छळ करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळला आहे. पोलिसांचा दावा आहे की, पोलीस ठाण्यामध्ये आणल्याच्या अवघ्या ५-६ मिनिटांच्या आत आदिलची तब्येत बिघडू लागली. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले आहे की, रक्तदाब न्यून झाल्यामुळे आदिलचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिलच्या मृतदेहावर कुठल्याही जखमा आढळल्या नाहीत. न्यायाधिशांच्या उपस्थितीत आदिलचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या राज्यात धर्मांध मुसलमानांकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण केले जाते, हे लक्षात घ्या ! काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना ही चपराकच होय !