लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये ४ जुलै या दिवशी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी २२ मेच्या रात्री केली. सुनक म्हणाले की, दुसर्या महायुद्धानंतर गेली ५ वर्षे देशासाठी सर्वांत आव्हानात्मक होती. येत्या काळात मी तुमच्या प्रत्येक मतासाठी लढेन. पुढील आठवड्यात संसद विसर्जित होईल.
४४ वर्षीय ऋषी सुनक हे प्रथमच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी कंझर्व्हेटिव्ह पक्षाने वर्ष २०२२ च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केला नव्हता.