कर्मयोगाचे महाब्धी (महासागर) असणारे सद्गुरु !

‘कर्माचा कर्मयोग करण्याकरता खुबी (कौशल्य) लागते, तसेच कर्मयोगाच्या आचरणाच्या सहजतेकरता शिक्षण लागते. या दोन्ही गोष्टी ज्यांनी आत्मसात् केल्या आहेत, त्यांनाच ‘सद्गुरु’ म्हणतात. सद्गुरूंचे आणखी एक वैशिष्ट्ये असे की, कर्मयोगखुबी तथा कर्मयोगविज्ञान ते स्वतःपुरतेच जाणतात असे नव्हे, तर ते त्याचे वितरणही करू शकतात आणि विवेचनही करू शकतात. कर्मयोगाचे महाब्धी (महासागर) तेच सद्गुरु !

– स्वामी विद्यानंद (साभार: ग्रंथ ‘चिंतनधारा’)