Anti-Hindu Karnataka Congress Govt : ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने बेळगाव पोलिसांकडून ६ हिंदु युवकांना अटक !

कर्नाटकमधील काँग्रेस शासनाचा हिंदुविरोधी कारभार !

(‘होर्डिंग’ म्हणजे मोठा फलक)

‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करण्यासाठी लावण्यात आलेले ‘होर्डिंग’

बेळगाव – येथील बापट गल्ली परिसरात ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने खडेबाजार पोलीस ठाण्यात ९ हिंदु युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांपैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. खडेबाजार पोलिसांनी या सर्वांवर २९५ (अ), ५०५, १४३, १४८ सहकलम १४९ अन्वये गुन्हे नोंदवले आहेत. यांतील नागेश मुरकुटे याला न्यायालयाने जामीन संमत केला आहे. चेतन किल्लेदार, शुभम किल्लेदार, लोकनाथ तथा लोकेश राजपूत, सतीश गवाणे, कार्तिक गवाणे, विनय मुरकुटे, आपाण्णा रायादे आणि प्रशांत चव्हाण अशी गुन्हा नोंद झालेल्या युवकांची नावे असून हे सर्व जण बापट गल्ली येथील रहिवासी आहेत.

१. १२ मेच्या रात्री बापट गल्ली येथे ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे २ होर्डिंग्ज लावण्यात आले होते. याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली.

२. यावर काही धर्मांधांनी आक्षेप घेतला. त्यामुळे पोलिसांनी १३ मे या दिवशी ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून ६ जणांना अटक केली.

संपादकीय भूमिका

  • ‘आम्ही लव्ह जिहादविरोधात काहीही करणार नाही आणि तुम्हालाही करू देणार नाही’ अशा वृत्तीचे पोलीस ! असे पोलीस समाजातील गुन्हेगारी कधीतरी संपवू शकतील का ?
  • नुकतीच कर्नाटक येथे नेहा हिरेमठ या तरुणीची ‘लव्ह जिहाद’वरून हत्या झाली. हे वास्तव असतांना त्या संदर्भात केवळ प्रबोधन करणारे होर्डिंग लावले; म्हणून हिंदु युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करणारे पोलीस धर्मांधांची तळी उचलत आहेत ! कर्नाटकात काँग्रेस शासन सत्तेत आल्यापासून हिंदूंवर अत्याचार वाढले आहेत, हेच विविध घटनांवरून दिसून येते !