‘काही वर्षांपूर्वी मला श्री गुरूंची सेवा करण्याची संधी मिळाली होती. कधी कधी ते क्षण आठवल्यावर माझी भावजागृती होते आणि वाटते, ‘किती जन्मांचे भाग्य म्हणून मला ही संधी मिळाली.’ श्री गुरूंच्या सहवासातल्या त्या क्षणांनी माझे पुढील जीवन आनंदी केले. त्या आठवणींचे स्मरण करतांना, एकदा ‘गुरुदेवांच्या देवघरातील फुले प्रत्यक्ष श्वास घेत आहेत’, हे गुरुदेवांनी आम्हाला स्थुलातून दाखवले होते, ते क्षण आठवले. ते सर्व आठवतांना मला काही ओळी सुचल्या, त्या येथे दिल्या आहेत.
श्री गुरूंनी मज दाविले दृश्य न्यारे ।
श्वास घेती त्यांच्या देवघरातील फुले ।।
आता पहाण्या मज काय उरले ।
श्री गुरुकृपे मी सारेच पाहिले’ ।।
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |