सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

कु. प्रतीक्षा हडकर

१. ‘कधी कधी मला माझ्या आज्ञाचक्रावर टिचकी मारल्याप्रमाणे जाणवते आणि आज्ञाचक्राच्या जवळ थंडावा जाणवतो.

२. कधी कधी ‘माझ्या आज्ञाचक्राच्या जवळ चटके बसत आहेत’, असे मला वाटते, तर कधी तेथे उष्णता जाणवते.

३. मी प्रार्थना करत असतांना माझे डोळे आणि आज्ञाचक्र यांवर थंडावा जाणवतो अन् माझे दोन्ही हात गरम होतात.

४. मी नामजप करत असतांना १ – २ वेळा मला झोप लागली आणि माझा नामजप चुकला. त्या वेळी झोपेतच ‘माझा नामजप चुकत आहे’, असे मला जाणवले आणि नामजप पुन्हा चालू झाला. एक घंट्याने जाग आल्यावरही माझा नामजप चालूच होता.

५. नामजप करतांना मला अधूनमधून थंडी वाजते आणि माझ्या अंगावर रोमांच येतात.

६. नामजप करत असतांना किंवा मंत्र म्हणत असतांना कधी कधी मला माझ्या सहस्राराजवळ लहानशी चीर पडल्याप्रमाणे जाणवते आणि तेवढाच भाग दुखतो. एकदा माझ्या सहस्रारावर चीर पडल्यासारखे दुखत असतांना मी डोक्याला तेल लावले, तरीही दुखणे थांबत नव्हते.

७. ज्याप्रमाणे एखादा आवडता पदार्थ खाल्ल्यावर पोट गच्च भरते, त्याप्रमाणे ‘भक्तीसत्संग ऐकल्यावर माझे हृदय गच्च भरून गेले आहे’, असे मला जाणवते.

हे क्षण मला अनुभवायला दिल्याबद्दल मी परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक