Baloch Seek India’s Help : भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा द्यावा !

‘बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट’चे नेते अल्लाह नजर बलोच यांचे आवाहन

तेहरान (इराण) – पाकिस्तानी सरकार बलुचिस्तानमधील बलुची लोकांवर गेली ७ दशके अत्याचार करत आहे. या जाचापासून बलुची लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा देणार्‍या ‘बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट’ या संघटनेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याला भारताचा पाठिंबा मागितला आहे. संघटनेचे नेते अल्लाह नजर बलोच म्हणाले की, आम्ही सौदी अरेबिया, इराण, अफगाणिस्तान आणि भारत यांना पाकिस्तानपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. पाकिस्तानी सैन्याने सहस्रावधी बलुचांचे अपहरण करून त्यांची हत्या केली आहे, असा आरोपही अल्लाह नजर बलोच यांनी केला.

इराणचा आश्रय घेतलेले अल्लाह नजर बलोच पुढे म्हणाले की,

१. आम्ही युरोपीयन युनियन, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ आणि मानवाधिकार संघटना यांसह आंतरराष्ट्रीय समुदायालाही पाकिस्तानकडून बलुच लोकांच्या केल्या जाणारे  मानवाधिकारांचे उल्लंघन रोखण्याचे आवाहन केले.

२. सहस्रो वर्षांपासून बलुच लोकांनी एक वेगळी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख आहे. अरब जगाशी आमचे सौहार्दपूर्ण संबंध राहिले.

३. पाकिस्तानने बलुचिस्तानवर ७६ वर्षांपासून बेकायदेशीर नियंत्रण मिळवले असून तो आमच्या लोकांवर पद्धतशीर अत्याचार अन् हिंसाचार करत आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तान आणि काश्मीर यांच्या नावाखाली भारताचे तुकडे करू पहाणार्‍या शक्तींना शह देण्यासाठी भारताने या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !