उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. अर्जुन चेतन खैरे हा या पिढीतील एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वैशाख शुक्ल तृतीया (१०.५.२०२४) या दिवशी चि. अर्जुन खैरे याचा प्रथम वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याची आई आणि आजी-आजोबा यांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. जन्मापूर्वी
अ. ‘वर्ष २०२२ मधील गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘मला गर्भधारणा झाली आहे’, असे समजले. त्या वेळी घरातील वातावरण प्रसन्न होते. मी घरातील कामे करूनही मला थकवा जाणवत नव्हता. मला प्रसन्न वाटत होते.
आ. मी प्रतिदिन नामजप करत होते. मी श्रीरामरक्षा स्तोत्र, गणपति स्तोत्र आणि अथर्वशीर्ष म्हणत होते.
इ. ‘मला सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सत्संग लाभावा’, असे सतत वाटत होते. मी काही मासांनी माहेरी गेल्यावर सद्गुरु जाधवकाकांना भेटायला गेले. त्या वेळी माझा कृतज्ञताभाव दाटून आला.
ई. मी माहेरी असतांना अधून मधून जळगाव सेवाकेंद्रात जाऊन नामजप करत असे. तेव्हा मी निर्विचार स्थिती अनुभवून मला शांत वाटत असे. मी पोटावर हात ठेवून नामजप केला की, मला गर्भाची हालचाल जाणवत असे.
२. प्रसूती
अ. माझी प्रसूती मला अधिक त्रास न होता १५ मिनिटांत झाली. तेव्हा मला गुरुदेवांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
आ. दुसर्या दिवशी स्त्रीरोग तज्ञ मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही तुमच्या गुरूंचे करता. त्यांच्या कृपेने तुमची प्रसूती लवकर आणि शुभ मुहुर्तावर झाली. ‘अन्य जणी शुभ मुहुर्तावर बाळ जन्माला यावे’, यासाठी दिवस ठरवून शस्त्रकर्म करतात.’’
३. जन्मानंतर
३ अ. वय – जन्म ते ६ मास
१. बाळाचा जन्म झाल्यावर त्याला भ्रमणभाषवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ध्वनीमुद्रित सत्संग ऐकवला. तेव्हा त्याने पूर्ण सत्संग ऐकला. तो भ्रमणभाषकडे एकटक पहात होता.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अर्जुन २० दिवसांचा होता. ब्रह्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहाण्यासाठी मी सेवाकेंद्रात गेले होते. तेव्हा अर्जुन ४ घंटे झोपला. त्याने ‘तो ब्रह्मोत्सव सूक्ष्मातून पाहिला’, असे मला वाटले.
३. अर्जुनला ‘अच्युतम् केशवम् कृष्ण दामोदरम्’ हे भजन आवडते. आम्ही भ्रमणभाषवर हे भजन लावल्यावर तो लगेच झोपतो. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेले पोवाडे आवडतात. आम्ही भ्रमणभाषवर पोवाडे लावल्यावर त्याचे रडणे थांबते.’
– सौ. सोनिका चेतन खैरे (अर्जुनची आई), मलकापूर
४. ‘अर्जुन ३ मासांचा असतांना एकदा रात्री पुष्कळ रडत होता. तेव्हा ‘काय करायचे ?’, ते आम्हाला कळत नव्हते. त्या वेळी मी त्याच्यासमोर प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र असलेला ग्रंथ धरला. तेव्हा प.पू. बाबांचे छायाचित्र पाहून त्याचे रडणे थांबले. तो ग्रंथ हातात घेण्याचा प्रयत्न करू लागला.’ – सौ अनिता पोळ (अर्जुनची आजी, अर्जुनच्या आईची आई), जळगाव
३ आ. वय – ६ मास ते १ वर्ष
१. ‘तो झोपेतून उठल्यावर कधीच रडत नाही. तो उठल्यावर आम्ही ‘जय श्रीकृष्ण’, असे म्हटल्यावर तो दोन्ही हात वर करतो आणि हसतो.
२. त्याला ‘कृष्णबाप्पा कुठे आहे ?’, असे विचारल्यावर तो भिंतीवरील कृष्णाच्या चित्राकडे पाहून बोट दाखवतो.
३. सद्गुरु जाधवकाकांच्या हस्ते अर्जुनचा अन्नप्राशन विधी झाला. तेव्हा तो सद्गुरु काकांना परत परत घास मागत होता.’
– सौ. सोनिका चेतन खैरे
३ आ ४. सात्त्विकतेची ओढ
अ. ‘अर्जुनला मंदिरात जायला पुष्कळ आवडते. आम्ही त्याला घेऊन मंदिरात गेल्यावर तो घंटा वाजवतो, दोन्ही हात जोडून नमस्कार करतो आणि रांगत प्रदक्षिणा घालतो.
आ. तो भगव्या झेंड्याकडे आकर्षित होतो.
इ. त्याला गायीच्या अंगावरून हात फिरवायला आवडते.’
– श्री. दिलीप पोळ (अर्जुनचे आजोबा, अर्जुनच्या आईचे वडील)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २३.३.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.