१. ‘१०.१२.२०१९ या दिवशी माझ्या मणक्याचे शस्त्रकर्म झाले, तरीही माझे कंबर आणि पाय सतत दुखत होते. आधुनिक वैद्यांना मला ‘एम्.आर्.आय.’ (टीप) चाचणी करून घ्यायला सांगितली. (टीप : हे रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आहे.)
२. त्या चाचणीच्या अहवालात ‘माझ्या मणक्यातील २ चकत्या बाहेर आल्या आहेत’, असे आढळले. ते पाहून आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘आता यावर कोणतेच उपचार करू शकत नाही. तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला वेदना झाल्यास वेदनाशामक गोळ्या घ्या आणि व्यायाम करा.’’
३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेला कंबर आणि पाय यांतील वेदना दूर होण्यासाठी नामजपादी उपाय सांगणे : माझ्या वेदना वाढल्यावर मला झोपून रहावे लागत होते. माझी कंबर आणि पाय यांच्यात होणार्या वेदना दूर होण्यासाठी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. सद्गुरु गाडगीळकाकांनी मला ‘श्रीराम जय राम जय जय राम । श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप प्रतिदिन २ घंटे करायला सांगितला. मला असलेला मधुमेहाचा त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु गाडगीळकाकांनी ‘श्री हनुमते नमः । श्री दुर्गादेव्ये नमः ।’ हा नामजप प्रतिदिन एक घंटा करायला सांगितला.
४. नामजपादी उपाय आणि योगासने केल्यामुळे साधिकेच्या शारीरिक स्थितीत सुधारणा होणे : मी हे नामजप अनुमाने दीड ते दोन वर्षे सातत्याने करत आहे. मागील २ मासांपासून मी प्रतिदिन ४५ मिनिटे योगासने करत आहे. यामुळे माझी शारीरिक स्थिती पूर्वीच्या तुलनेत सुधारली आहे. मागील १५ – २० वर्षे मला रात्री झोप लागत नसे; पण आता मला रात्री ३ – ४ घंटे शांत झोप लागते.
प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे हे शक्य झाले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती कमल आनंदा गरुड (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |