Canada’s Bill C-63 : द्वेषयुक्त भाषणे करणार्‍यांना दंडित करणारे ‘सी-६३’ विधेयक कॅनडाच्या संसदेत सादर !

ओटावा – कॅनडा सरकारने द्वेषयुक्त भाषणे करणार्‍या व्यक्तींना दंडित करणारे ‘ऑनलाइन हार्म्स बिल’ म्हणून ओळखले जाणारे ‘सी-६३’ विधेयक संसदेत सादर केले आहे. लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी हे विधेयक सादर करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. तथापि या विधेयकामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर अभूतपूर्व नियंत्रण येऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हे विधेयक द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या समस्येचे कठोरपणे निराकरण करण्यासाठी कॅनेडियन कायद्यात सुधारणा करील.‘सी-६३’ विधेयकात नमूद केले आहे की, जेव्हा कुणी संसदेच्या कोणत्याही कायद्यानुसार वंश, भाषा, रंग, धर्म, लिंग, वय, मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व, लैंगिक प्रवृत्ती किंवा अभिव्यक्ती यांच्या अंतर्गत द्वेषपूर्ण वक्तव्य करील, तेव्हा तो एक अदखलपात्र गुन्हा मानला जाईल. अशा गुन्ह्याची शिक्षा जन्मठेपेइतकी कठोर असू शकते.