World Suffering From ‘Anemia’:जगातील २०० कोटी लोक ‘अ‍ॅनीमिया’ने  ग्रस्त !

नवी देहली – ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’नुसार जगभरात सुमारे २०० कोटी लोक अ‍ॅनीमिआने (अ‍ॅनीमिया म्हणजे रक्तामध्ये लोहाची कमतरता म्हणजेच रक्तात हिमोग्लोबिन किंवा आर्बीसी पुरेसे नसणे) ग्रस्त आहेत. हा आकडा मधुमेही रुग्णांपेक्षा अधिक आहे. लोहाच्या कमतरतेमुळे शरिराची वाढ आणि विकास थांबतो. शरिराचे अवयव निकामी होऊ शकतात. गर्भधारणेच्या वेळी केस गळतात आणि आई आणि मूल यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

१. लोह हे एक अतिशय खास खनिज आहे, जे आपल्या शरिराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन लोहाच्या साहाय्याने बनते.

२. शरिरात लोहाची कमतरता अल्प असल्यास हिमोग्लोबिन अल्प होते. आपल्या स्नायूंमध्ये मायोग्लोबिन नावाचे एक विशेष प्रोटीन असते. हे प्रथिन ऑक्सिजन साठवून ठेवते आणि आवश्यकतेनुसार स्नायूंना देते.

३. मायोग्लोबिन सिद्ध करण्यात लोहाची मोठी भूमिका असते.आपल्या शरिराला अनेक हार्मोन्स सिद्ध करण्यासाठी लोहाची आवश्यकता असते.

४. लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो आणि अशक्तपणा इतर अनेक रोगांचे कारण बनू शकतो.