नाशिक येथे ‘आयसीआसीआय होम फायनान्स’चे लॉकर तोडून चोरट्यांनी ५ कोटी रुपयांचे दागिने पळवले !

नाशिक – शहरातील जुना गंगापूर नाका परिसरात असलेल्या आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेच्या शाखेच्या लॉकरमधील ५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी ४ मेच्या पहाटे पळवले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २२२ ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे.

‘आयसीआयसीआय होम फायनान्स’ शाखेच्या व्यवस्थापक कार्यालयाची खिडकी उघडून २ चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. कार्यालयातील ‘सेफ्टी लॉकर’च्या चाव्या घेऊन सेफ्टी लॉकर उघडले.

या घटनेने बँकेच्या खातेदारांमध्ये भीती पसरली आहे. एका चोरट्याने कोरोनाच्या काळात वापरल्या जाणार्‍या पांढर्‍या रंगाच्या ‘सेफ्टी सूट’चा वापर केला होता, तर दुसर्‍या चोरट्याने पांढर्‍या रंगाची टोपी आणि मास्क घातला असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. माहितीगार व्यक्तींनी चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे.