Ahmedabad Schools Threat Mail : शरिया कायदा लागू केला नाही, तर ७ शाळा बाँबने उडवू !

कर्णावती (अहमदाबाद) येथील शाळांना धमकीचे पत्र !

कर्णावती (गुजरात) – काही दिवसांपूर्वी देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथे  १०० हून अधिक शाळांना बाँबने उडवण्याची धमकी आल्यानंतर आता अशीच धमकी येथे मिळाली आहे. शरिया कायदा लागू केला नाही, तर शहरातील ७ शाळांना बाँबने उडवून टाकू, असे या ७ शाळांना ई-मेलद्वारे मिळालेल्या धमकीच्या पत्रात लिहिले आहे.

अहमदाबाद गुन्हे शाखेचे पोलीस उपायक्त अजित राजियान यांनी या संदर्भात सांगितले की, बाहेरच्या देशातून हा ई-मेल आल्याची प्राथमिक माहिती आहे. याचे अन्वेषण केले जात आहे. या व्यतिरिक्त भारतातूनही अशा प्रकारे कुणी ई-मेलद्वारे असे काही पाठवत असेल, तर त्याकडेही आम्ही लक्ष ठेवून आहोत.