भारताच्या लोकसभा निवडणुकीला अपकीर्त करण्याचा ‘बीबीसी’चा प्रयत्न !
लंडन – गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारतातील दुसरी ‘सर्वांत शक्तीशाली व्यक्ती’ म्हटले जाते. त्यांना भाजपच्या उदयाचे सूत्रधार म्हणून पाहिले जाते. याच अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याविषयी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे, असे धादांत खोटे वृत्त ‘बीबीसी’ने प्रसिद्ध केले आहे.
१. २७ एप्रिल २०२४ या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक बनावट व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. हा व्हिडिओ तेलंगणा काँग्रेसचे ‘एक्स हँडल’, तसेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शेअर केला होता. या बनावट व्हिडीओमध्ये अमित शहा ‘एस्सी-एस्टी’ आणि ‘ओबीसी’ यांचे आरक्षण रहित करण्याविषयी बोलतांना दिसत आहेत. या प्रकरणी तेलंगणा काँग्रेसचे सामाजिक माध्यम संयोजक अरुण रेड्डी यांना अटक करण्यात आली होती; मात्र या वृत्तामध्ये छेडछाड करून ‘बीबीसी’ने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना अटक असे खोटे वृत्त प्रसारित केले.
२. काही दिवसांपूर्वी ‘बीबीसी’ने वर्ष २००२ मधील गुजरात दंगलीवर एक लघुपट प्रसारित करून सत्ताधारी भाजप आणि हिंदू यांना अपर्कीत करण्याचा प्रयत्न केला होता.
३. देशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असलेल्या भारतात मतदानाच्या ७ टप्प्यांपैकी २ टप्प्यांचे मतदान शांततेत पार पडले आहे; मात्र ‘बीबीसी’सारखी भारतविरोधी जागतिक प्रसारमाध्यमे खोट्या तथ्यांसह एकतर्फी अहवाल आणि बातम्या प्रसिद्ध करून भारताच्या लोकशाही व्यवस्थेला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
संपादकीय भूमिकासातत्याने भारतद्वेषी आणि हिंदूविरोधी भूमिका घेणार्या बीबीसीवर भारतात बंदी घालण्यासाठी भारत सरकारने पावले उचलणे आवश्यक ! |