नऊ प्रकारच्या लोकांशी शत्रुत्व करू नये !

१. ‘सशस्त्र लोकांशी निःशस्त्र लोकांनी शत्रुत्व करता कामा नये.

२. अपराधी माणसाने आपले रहस्य जाणणार्‍याशी शत्रुत्व करता कामा नये.

३. स्वामींशी शिष्याने कधीही शत्रुत्व करता कामा नये.

४. धूर्त आणि दुर्जन यांच्याशी सात्त्विक मनुष्याने कधीही शत्रुत्व करता कामा नये.

५. श्रीमंताशी गरिबाने कधीही शत्रुत्व करता कामा नये.

६. शूरविरांशी भाटाने कधीही शत्रुत्व करता कामा नये.

७. राजाशी कवीने कधीही शत्रुत्व करता कामा नये.

८.  वैद्याशी रोग्याने कधीही शत्रुत्व करता कामा नये.

९. स्वयंपाक्याशी (आचार्‍याशी) खाणार्‍याने कधीही शत्रुत्व करता कामा नये.’

या ९ लोकांशी जो शत्रुत्व किंवा विरोध करत नाही, तो सुखी राहू शकतो.

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)