मुंबई – महिलेच्या भ्रमणभाषमधून तिची छायाचित्रे चोरून ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. ही घटना भाईंदर येथे घडली आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. एका राजकीय पक्षाशी संबंधित महिलेला एका आरोपीने आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. तिच्या भ्रमणभाषवर निवडणूक मतदार सूचीचे ॲप डाऊनलोड करायचे असल्याचे सांगून तिच्याकडून भ्रमणभाष घेतला. या वेळी आरोपीने तिला कार्यालयाबाहेर थांबण्यास सांगितले.
२. भ्रमणभाष परत घेतल्यानंतर या महिलेने तिच्या व्हॉट्सॲपचे अन्य ठिकाणी लॉगइन झाले असल्याचा संदेश आला होता.
३. काही दिवसांनी या महिलेला मुंबईच्या एका पत्त्यावरून एक पत्र आले. त्यात तिने राजकारणात चालू असलेले काम त्वरित थांबवण्याविषयी सांगण्यात आले. तसे न केल्यास महिलेची छायाचित्रे मॉर्फ करून ती प्रसारित करत बदनामी करण्याची धमकी देण्यात आली.
संपादकीय भूमिका :महिलांची फसवणूक करणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! |