पुणे येथे सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त अभूतपूर्व उत्साहात पार पडली सनातन गौरव दिंडी !

९ सहस्र हिंदूंची उपस्थिती !

दिंडीमध्ये सहभागी मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ

पुणे – सनातन धर्माच्या प्रसारासाठी समर्पित असलेल्या सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीसाठी ९ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती होती. या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे डॉ. संदीप पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.’

शंखनाद करतांना श्री. विजय चौधरी
ध्वजपूजन करतांना डावीकडून श्री. राजेंद्र बलकवडे, श्री. सुनील रासने
नारळ वाढवतांना श्री. शेखर मुंदडा

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पालखी
तुळजाभवानी माता पालखी
छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी

सनातन संस्था विखुरलेल्या हिंदूंना हिंदु म्हणून एकत्र करत आहे ! – विवेक सिन्नरकर

श्री. विवेक सिन्नरकर

सनातन संस्था आणि वैदिक धर्म वेगळा नसून दोन्ही एकच आहेत. ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमणे केली. जातीमध्ये फूट पाडली. त्यामुळे आपण कधी एकत्र आलो नाही; मात्र आपण संघटित झाल्यास शत्रूंना वचक बसेल. अशा स्थितीत सनातन संस्था विखुरलेल्या हिंदूंना हिंदु म्हणून एकत्र करण्याचे काम करत आहे. भारतीयत्व आणि हिंदुत्व हे दोन्ही वेगळे नसून दोन्ही एकच आहेत. त्यामुळे आपण भारतामाता, गोमाता, गंगामाता या सर्वांचा सन्मान केला पाहिजे, असे प्रतिपादन सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक श्री. विवेक सिन्नरकर यांनी केले.


सनातन धर्माला विरोध करण्याचे षड्यंत्र चालू ! – सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु स्वाती खाडये

सनातन धर्माला विरोध करण्याचे मोठे षड्यंत्र सध्या चालू आहे. खरे पहाता सनातन धर्म आणि हिंदु धर्म वेगळे नाहीत. आपल्याला सर्वांना आदर्श असे रामराज्य केवळ भारतात नव्हे, तर जगभरात आणायचे आहे. त्यासाठी आपण प्रयत्नरत राहूया.


प्रत्येकाला जीवनात धर्म आणावा लागेल ! – चेतन राजहंस

श्री. चेतन राजहंस

हिंदू सहस्रोंच्या संख्येने जरी रस्त्यावर आले, तरी कधीच समाजविघातक कृती करत नाहीत. हिंदूंचे संघटन हे धर्मद्वेषींच्या मनात धडकी भरवणारे व्हायला हवे. हे राष्ट्र रामराज्यात रूपांतरित व्हायला हवे; कारण येथे होणारे यज्ञ विश्वशांतीसाठी होतात, प्रार्थना विश्वकल्याणासाठी होते.

ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हेही विश्वकल्याणासाठी होते. प्रत्येकाला जीवनात धर्म आणावा लागेल आणि हेच कार्य सनातन संस्था अनेक वर्षे करत आहे. संस्थेचे वैचारिक आणि धार्मिक कार्य अविरतपणे चालू आहे.’’


जगद्गुरु श्री मन्मध्वार्च मूलमहासंस्थानम् ‘नंजनगुड श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी’ मठाच्या वतीने दिंडीचे भावस्पर्शी स्वागत !

जगद्गुरु श्री मन्मध्वार्च मूलमहासंस्थानम् ‘नंजनगुड श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी’ मठाच्या वतीने ‘सनातन गौरव दिंडी’चे अतिशय भावस्पर्शी स्वागत करण्यात आले. दिंडी मठाच्या ठिकाणी पोचल्यावर धर्मध्वजाचे पूजन करून धर्मध्वजाला भगवे वस्त्र अर्पण करण्यात आले. यानंतर मठाच्या वतीने श्री भवानीदेवीच्या पालखीची पूजा करण्यात आली. पू. (सौ.) मनीषा पाठक आणि श्री. चेतन राजहंस यांनी मठात जाऊन दर्शन घेतले. या प्रसंगी मठाच्या वतीने विशेष भगवे वस्त्र देऊन श्री. राजहंस यांचा सत्कार आणि पू. (सौ.) मनीषा पाठक अन् सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान करण्यात आला. मठाच्या वतीने सर्व दिंडीकर्‍यांसाठी पन्ह्याची सोय केली होती.


रणरागिणी पथक
दिंडीत प्रात्यक्षिके करतांना किशोर आणि युवा प्रशिक्षणार्थी
दिंडीत सहभागी झालेले गदा पथक

विविध ठिकाणी करण्यात आलेली पुष्पवृष्टी

  • ‘पायताण’ दुकानासमोर मोयी, भोसरी येथून आलेल्या धर्मप्रेमींनी पुष्पवृष्टी केली.
  • ‘कीर्ती साडी सेंटर’ येथे पारगाव सालूमालू येथील धर्मप्रेमींनी, तसेच अधिवक्ता मंगेश जोशी आणि अधिवक्ता ईशानी जोशी यांनी पुष्पवृष्टी केली.
  • लक्ष्मी रस्त्यावर ‘पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स’च्या व्यवस्थापिका ज्योती बेलापूरकर यांनी पुष्पवृष्टी केली.
  • लक्ष्मी रस्त्यावर ‘जनता खादी भांडार’चे मालक श्रीनिवास जन्नू यांनी पुष्पवृष्टी केली.
  • लक्ष्मी रस्ता-गणपति चौक व्यापारी संघटनेचे सभासद सर्वश्री नयन ठाकूर, प्रशांत टिकार, परेश देवळणकर, तसेच विश्व हिंदु परिषद संवर्धन महाराष्ट्र प्रांत प्रमुख हलाल नियंत्रण मंच महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रवक्ते डॉ. संदीप पाटील आणि महिला आघाडी प्रमुख हलाल नियंत्रण मंचाच्या सौ. सरोजिनी संदीप पाटील यांनी पुष्पवृष्टी केली.
  • ‘रांका ज्वेलर्स’चे श्री. फत्तेचंद रांका यांनी दिंडीचे स्वागत केले आणि पुष्पवृष्टी करून पालखीला पुष्पहार अर्पण केला.
  • ‘कलाक्षेत्रम् साडी सेंटर’चे श्री. सागर पासकंठी, अष्टेकर ज्वेलर्सचे श्री. बाळासाहेब अष्टेकर आणि श्री. वसंत बाबुराव अष्टेकर ज्वेलर्स यांनी पुष्पवृष्टी केली.
  • अलका टॉकीज चौकात हिवरे गावातील धर्मप्रेमी, अधिवक्ता मंगेश जेजुरीकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी, तसेच लकडी पूल येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्याध्यक्ष श्री. दिलीप बांदल आणि श्री. दीपक थोरात यांनी पुष्पवृष्टी केली.

३ विविध बाल पथक
विविध गावांतून सहभागी झालेले पथक
प्रशिक्षण, मर्दानी खेळ, रणरागिणी, गदा पथक, हिंदु साम्राज्य पथक

काही प्रतिक्रिया

१.  श्री. राहुल जयस्वाल – मला सनातन धर्माचा अभिमान आहे. मी अयोध्येला रहात असून माझ्या घरच्यांना देखील या दिंडीचा व्हिडिओ मी पाठवणार आहे.

२. दीपाली बनसोडे – दिंडी पाहून पुष्कळ आनंद झाला. अतिशय शिस्तबद्ध आणि शांतपणे ही दिंडी पार पडत आहे. दिंडी पाहून पुष्कळ शांत आणि प्रसन्न वाटले.

३. श्री. अनंत लिमये – सनातन संस्थेचे उपक्रम अनेक वर्षे पहात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे; मात्र थोडे वाईट वाटते की, हिंदूंना जागे करण्यासाठी अशा प्रकारची दिंडी काढण्याची आवश्यकता आहे.

४. सौ. स्वाती काळे – दिंडीतील उत्साह पाहून मन भरून आले. सनातनधर्माविषयी जागृती करणे काळाची आवश्यकता आहे. दिंडीमध्ये सहभागी महिला, बालसाधक पथक, युवावर्ग, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांचा समावेश पाहून भारावून गेले.

५. श्री. अनिल यादव – हिंदु संस्कृती जपण्याचा आणि सनातन धर्माची पताका फडकवण्याचा प्रयत्न करू.

६. श्री. धनराज चोपडा आणि सौ. मीनाक्षी जावळकर – हिंदूंचे संघटन वाढवायला हवे. हिंदु धर्म महान आहे, याविषयी सर्वांमध्ये जागृती व्हायला हवी.

क्षणचित्र : दिंडीच्या मार्गावर समाजातील अनेक धर्मप्रेमी नमस्कार करत होते.

उपस्थित मान्यवर : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, श्री संप्रदायच्या महिला अध्यक्षा सौ. सुरेखा गायकवाड, श्री. गायकवाड, पुणे येथील पतित पावन संघटनेचे अध्यक्ष श्री. स्वप्नील नाईक, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक श्री. सूर्यकांत पाठक, व्यावसायिक श्री. विश्राम कुलकर्णी, भोर येथील केबलचालक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. ज्ञानेश्वर बांदल, भाजपचे माजी नगरसेवक श्री. जयंत भावे, वडगाव शेरी येथील धर्माचार्य श्री. व्यंकटेश कुलकर्णी, भाजपच्या महिला आघाडीप्रमुख अधिवक्त्या ईशानी जोशी, सेवा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिरीष मोहिते, पुणे रेस्टॉरंट आणि केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. किशोर सरपोतदार

सहकार्य : सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने ‘सनातन गौरव दिंडी’च्या सांगतेसाठी मैदान उपलब्ध करून दिले.

वरुणदेवतेची कृपा !

दिंडीच्या समारोपप्रसंगी उपस्थित हिंदू

दिंडीच्या आदल्या दिवशी म्हणजे २० एप्रिलला सायंकाळी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे दिंडीच्या मार्गाची शुद्धीच जणू वरूण देवतेने केली. त्यामुळे वातावरणातील उष्मा अल्प झाल्याने दिंडीच्या दिवशी वातावरणात गारवा होता, तसेच त्या दिवशी पाऊस न आल्याने दिंडी निर्विघ्नपणे पार पडली.