Himalayas Glacial Lakes Expansion : हिमालयातील २७ टक्के हिमनदी तलावांमध्ये मोठा विस्तार ! – इस्रो

नवी देहली – भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने सांगितले की, हिमालयातील २७ टक्क्यांहून अधिक हिमनदी तलावांचा वर्ष १९८४ पासून लक्षणीय विस्तार झाला आहे. या ६७६ तलावांपैकी १३० भारतात आहेत. उपग्रहांद्वारे मिळालेल्या माहितीवरून हे समोर आले आहे.

१० हेक्टरपेक्षा मोठ्या २ सहस्र ४३१ तलावांपैकी ६७६ हिमनदी तलावांचा वर्ष १९८४ पासून लक्षणीय विस्तार झाला आहे. त्यातही ६०१ तलावांचा विस्तार दुप्पट झाला आहे, तर उर्वरित तलावांचा विस्तार दीड पटीने वाढला आहे.

संपादकीय भूमिका

हे तलाव फुटले, तर त्यांतील पाण्यामुळे मोठा पूर येऊन मोठी हानी होऊ शकते, हे पहाता सरकारने त्यावर आतापासूनच उपाययोजना काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !