Rajesh Kotyan Murder:राजेश कोट्यान हत्याप्रकरणी चारही आरोपींना जन्मठेप !

मंगळुरू – उळ्ळाल कोटेपूर येथे १२ एप्रिल २०१६ या दिवशी धर्मद्वेषामुळे करण्यात आलेल्या राजेश कोट्यान उपाख्य राज (वय ४४ वर्षे) यांच्या हत्येच्या प्रकरणातील चारही आरोपींना मंगळुरू जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या आरोपींमध्ये महंमद आसिफ (वय ३१ वर्षे), महंमद सुहेल (वय २८ वर्षे), अब्दुल मुतालिप उपाख्य मुत्तू (वय २८ वर्षे) आणि अब्दुल अस्वीर उपाख्य अच्चु (वय २७ वर्षे) यांचा समावेश आहे. या प्रकरणातील दोन अल्पवयीन मुलांचे अन्वेषण बाल न्यायालयात चालू आहे. शिक्षा झालेल्या आरोपींना प्रत्येकी २५ सहस्र रुपये दंड ठोठावण्यात आला असून ती रक्कम राजीव कोट्यान यांच्या पत्नीला द्यावी, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.