सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी सातारा जिल्ह्यातील जिज्ञासू आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री. विनोद चव्हाण, जिज्ञासू

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव पाहून पुष्कळ आनंद झाला आणि छानही वाटले. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन सुंदर केले होते.

२. गुरुदेवांना पाहून पुष्कळ आनंद झाला.’

सौ. मोनाली सूर्यवंशी, जिज्ञासू

१. ‘ब्रह्मोत्सवाच्या वेळी गुरुदेवांचे मैदानात आगमन होताच ‘सोनेरी रंगांची लाट सर्वत्र पसरत आहे’, असे मला जाणवले.

२. मला श्री गुरुदेवांच्या चरणांमध्ये त्रिदेवांचे दर्शन झाले.

३. माझी सेवेप्रती सकारात्मकता वाढली. आता मी केंद्रामध्ये दायित्व घेऊन सेवा करू शकते. ’

शिवांजली घोरपडे, जिज्ञासू

१. ‘मागील २ वर्षांपासून ‘माझी गुरुदेवांशी भेट व्हावी’, असा विचार माझ्या मनामध्ये येत होता. गुरुदेवांनी ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून माझी इच्छा पूर्ण केली. त्यामुळे कृतज्ञताभावामुळे माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले.

२. आता माझा सेवेतील उत्साह वाढला आहे. मी नामदिंडीच्या सेवेतही सहभागी होत आहे.’

सौ. सुषमा भिसे

१. ‘ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम चालू झाल्यापासून माझ्या मनामध्ये शरणागतभाव जागृत झाला होता.

२. तिन्ही गुरुमाऊली रथात बसल्या होत्या. तेव्हा मला ‘सर्व साधक स्वर्गलोकात आहेत आणि देवता गुरुदेवांवर पुष्पवृष्टी करत आहेत’, अशी अनुभूती आली अन् माझी भावजागृती झाली.

३. मी कार्यक्रमावरून परत आल्यापासून माझा नामजप आणि प्रार्थना होत आहेत, तसेच माझे भावजागृतीचे प्रयत्नही वाढले आहेत.’

श्री. प्रकाश भोसले

१. ‘ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमात गुरुदेवांनी जी अनुभूती दिली, ती मी शब्दांत सांगू शकत नाही. माझा गुरुदेवांप्रती भाव जागृत झाला होता.

२. कार्यक्रमानंतर मी सकारात्मक झालो. आता मी नामदिंडीसाठी माझ्या समवेत १० जणांना घेऊन येणार आहे. माझा सेवेप्रती भाव वाढला आहे.’

सौ. मीनाक्षी पाटील

१. ‘गुरुमाऊलींच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर प्रत्येक उपक्रमामध्ये सेवा करूया’, असा विचार माझ्या मनामध्ये वाढला आहे.

अभिराज शिर्के

१. ‘गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवानंतर ‘माझ्यातील भावामध्ये वाढ झाली आहे’, असे मला वाटत आहे. मी नामदिंडीमध्ये कोणतीही सेवा करू शकतो. आता माझी पूर्वीच्या तुलनेत सेवेप्रती तळमळ वाढली आहे.’

श्री. सुनील पाटील

१. ‘गुरुदेवांची प्रकृती ठीक नसतांनाही केवळ साधकांवर असलेल्या अपार प्रीतीमुळे ते साधकांसाठी सोहळ्यात पूर्णवेळ बसून होते. हे बघून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२. कार्यक्रमाचे नियोजन करणार्‍या सर्व साधकांची तळमळ आणि नियोजन यांमुळे मला हा कार्यक्रम बघता आला; म्हणून मला त्या सर्व साधकांप्रती कृतज्ञता वाटली.

३. कार्यक्रम बघून परत आल्यापासून माझा सेवा करण्यासाठीचा उत्साह वाढला आहे. मी वैश्विक हिंदु राष्ट अधिवेशनाच्या कालावधीत सेवा करण्यासाठी एक मास रामनाथी आश्रमात  असणार आहे.’

सौ. नंदा नलवडे, जिज्ञासू

१. ‘कार्यक्रम फार छान वाटला. कार्यक्रमाला येण्यापूर्वी मला मोठी अडचण आली होती; पण गुरुदेवांच्या कृपेने दुसर्‍याच दिवशी अडचण सुटली. त्यामुळे माझी गुरुदेवांवर श्रद्धा अधिक वाढली आहे. सध्या मी नामदिंडीसाठी माझ्या नातेवाइकांनाही निमंत्रण देत आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ६.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक