भिवंडी येथे १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण !

ठाणे – भिवंडी येथील टेमघर पाडा भागात वाहनाचे नुकसान केल्याचा आरोप करत शेजारच्या महिलेने १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण केली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. मुलाने असे कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगूनही ती महिला त्याला मारहाण करत होती.